
भारत पाकिस्तान सामना असला की क्रीडाप्रेमी वेळ काढून हा सामना पाहतात. कारण हायव्होल्टेज सामना पाहण्याची संधी कोण सोडणार? 2025 या वर्षात भारत पाकिस्तान सामन्यांची पर्वणी क्रीडाप्रेमींनी अनुभवली. आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तान तीन वेळा आमनेसामने आले होते. या तिन्ही सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. अंतिम सामन्यात तर धाकधूक वाढली होती. कारण सुरुवातीला झटपट विकेट पडल्याने हा सामना पाकिस्तानच्या पारड्यात झुकला होता. पण तिलक वर्माने केलेल्या खेळीमुळे टीम इंडियाला विजयश्री खेचून आणता आला. वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती. आता 2026 या नव्या वर्षात भारत पाकिस्तान सामना कधी आहे ते जाणून घ्या.
भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना पाहण्याची संधी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत मिळेल. हा सामना 15 फेब्रुवारीला होणार आहे. हा सामना कोलंबोच्या मैदानात होईल. टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. टीम इंडियावर पाकिस्तानला पराभूत करण्याचा दबाव असणार आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. या गटातून दोन संघांना पुढच्या फेरीत संधी मिळणार आहे.
झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशात अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा फेब्रुवारी मार्चमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. साखळी फेरीत भारत पाकिस्तान भिडणार नाही. पण उपांत्य किंवा अंतिम फेरीत भिडण्याची शक्यता आहे. भारताचा पहिला सामना 15 जानेवारीला अमेरिकेशी होणार आहे.
आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद इंग्लंडकडे आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सामना होणार आहे. स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होईल. या स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना होईल. या सामन्याचं वेळापत्रक काही समोर आलेलं नाही. नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने पाकिस्तानला पराभूत केलं होतं.