
आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोहलीची बॅटिंग झाली आहे. आता पुढचा हंगाम एका वर्षांनी असणार आहे. त्यामुळे आता विराट कोहलीला फलंदाजी करताना कधी पाहता येईल, यासाठी त्याचे चाहते अधीर आहेत. कारण विराट कोहलीने कसोटी आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. विराट कोहलीने आयपीएल स्पर्धा सुरु असताना कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. 12 मे रोजी त्याने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला. म्हणून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दिसणार नाही. त्यामुळे आता विराट कोहली फलंदाजी करताना त्याच्या चाहत्यांना लवकर दिसणार नाही. पण यासाठी किती काळ वाट पाहावी लागेल याबाबत चाहते आतुर आहेत. तर विराट कोहलीला परत मैदानावर फलंदाजी करताना पाहण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण विराट कोहली आता फक्त वनडे सामने खेळणार आहे.
ऑगस्टमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात वनडे आणि टी20 मालिका खेळली जाणार आहे. अशा परिस्थितीत, कोहली या मालिकेतूनच क्रिकेट मैदानावर दिसू शकतो. या मालिकेसाठी टीम इंडियाला बांगलादेशचा दौरा करायचा आहे. ही मालिका 17 ऑगस्टपासून सुरू होणार आहे तीन वनडे सामने खेळले जाणार आहेत. पण विराट कोहली या मालिकेत खेळेल की नाही हे सध्या स्पष्ट नाही.
जर विराट या मालिकेत खेळला नाही तर चाहत्यांची वाट ऑक्टोबरपर्यंत वाढेल कारण त्यानंतर टीम इंडिया मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाईल. हा दौरा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आहे. या मालिकेत 3 एकदिवसीय सामने खेळले जातील. ही मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरू होईल.
विराट कोहली आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 15 सामन्यातील 15 डावात 657 धावा केल्या. या खेळीत त्याने 8 अर्धशतकं ठोकली आहेत. पण रोमांचक सामन्यात आरसीबीचा प्रमुख फलंदाज विराट कोहली 43 धावांवर बाद झाला. यामुळे चाहते अत्यंत निराश झाले. विराट कोहलीची पत्नी, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा स्टेडियममध्ये सामना पाहत होती, कोहलीची विकेट पाहून खूप भावनिक झाली.