AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : फिलिप सॉल्टचा झेल पाहीलात का? प्रियांश आर्याने षटकारच मारला होता पण…

आयपीएल 2025 स्पर्धेत आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 191 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग ही जोडी मैदाना आली होती. ही जोडी फोडण्यात जोश हेझलवूडला यश आलं. पण फिलिप सॉल्टने अप्रतिम झेल पकडला.

Video : फिलिप सॉल्टचा झेल पाहीलात का? प्रियांश आर्याने षटकारच मारला होता पण...
फिलिप सॉल्ट झेलImage Credit source: Twitter
| Updated on: Jun 03, 2025 | 10:37 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एका अप्रतिम झेलचं दर्शन घडलं. आरसीबीच्या फिलिप सॉल्टने पंजाब किंग्सच्या प्रियांश आर्यचा अप्रतिम झेल पकडला. हा चेंडू सीमेपार जाईल असं वाटत होतं पण तसं झालं नाही. उलट प्रियांशला बाद होत तंबूत परतावं लागलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमवून 190 धावा केल्या आणि विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठण्यासाठी पंजाब किंग्सकडून सलामीला प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्या ही जोडी आली. या जोडीने सावध पण चांगल्या खेळीला सुरुवात केली होती. ही जोडी फोडण्याचं मोठं आव्हान होतं. तिसरं षटक टाकण्यासाठी जोश हेझलवूड आला होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर प्रभसिमरन सिंग चुकला झेल शेफर्डच्या हातात होता. पण त्याला काही पकडता आला नाही. त्यामुळे आरसीबीवर दडपण वाढलं होतं. पण चूक पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सुधारली. यावेळी प्रभसिमरन नाही तर प्रियांशची विकेट मिळाली.

प्रियांश आर्याने शॉर्ट लेंथ बॉलवर सीमेपार चेंडू मारला. पण षटकार जाईल असं वाटत असताना वाऱ्याच्या वेगाने फिलिप सॉल्ट आला आणि षटकाराच्या चेंडू पकडला. स्वत: बाहेर जात असताना चेंडू आत फेकला आणि पुन्हा पकडला. त्याच्या या झेलचं कौतुक होत आहे. कारण अंतिम सामन्यात अशाप्रकारे झेल पकडणं हे संघाच्या फायदाचं असतं. प्रियांश आर्या आरसीबीसाठी डोकेदुखी ठरत होता. प्रियांशने 19 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 24 धावा केल्या.

दरम्यान, आरसीबी आणि पंजाब किंग्स यांच्यात जेतेपदाची मोठी लढत आहे. कारण दोन्ही संघांनी कधीच जेतेपद मिळवलेलं नाही. त्यात 190 धावांचं आव्हान तसं पाहायला गेलं तर सोपं आहे. त्यामुळे पंजाब किंग्स हे आव्हान गाठणार का? की आरसीबी रोखणार हे महत्त्वाचं आहे. जो संघ अंतिम सामन्यात जिंकेल त्याचं 17 वर्षांचं अपुरं स्वप्न पूर्ण होणार आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.