AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI | बुमराह-शमी नसताना, सिराजच्या साथीला कोणाला निवडायच? रोहित-द्रविड जोडीसमोर मोठा प्रश्न

IND vs WI | वेस्ट इंडिजमधल्या कसोटी मालिकेात यशस्वी जैस्वाल-ऋतुराज गायकवाड यांना जशी छाप उमटवण्याची संधी आहे, तशीच चारच गोलंदाजांसाठी सुद्धा मोठी संधी आहे. फक्त या संधीच सोन कोण करतं? ते लवकरच समजेल.

IND vs WI | बुमराह-शमी नसताना, सिराजच्या साथीला कोणाला निवडायच? रोहित-द्रविड जोडीसमोर मोठा प्रश्न
Team IndiaImage Credit source: BCCI
| Updated on: Jul 09, 2023 | 10:28 AM
Share

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमचा वेस्ट इंडिज दौरा 12 जुलैपासून सुरु होणार आहे. दोन टेस्ट मॅचने सीरीजची सुरुवात होणार आहे. डॉमिनिकामध्ये पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. टीम इंडिया बारबाडोसमध्ये सराव केल्यानंतर आता डॉमिनिकामध्ये पोहोचली आहे. पहिल्या मॅचची तयारी त्यांनी सुरु केलीय. याच सीरीजपासून टीम इंडिया आपल्या तिसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अभियानाची सुरुवात करणार आहे. पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग-11 मध्ये कुठल्या वेगवान गोलंदाजांना संधी द्यायची? हा कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांच्यासमोरचा प्रश्न असणार आहे.

भारताच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाबद्दल बोलायच झाल्यास सर्वप्रथम जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच नाव येतं. दोघांनी बऱ्याच वर्षांपासून वेगवान गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर संभाळली आहे. सध्या बुमराह दुखापतीमधून सावरतोय आणि शमीला विडिंज दौऱ्यासाठी आराम दिलाय. आता टीम इंडिया कुठल्या वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरणार हा प्रश्न आहे.

सिराजच्या जोडीला अन्य दोन कोण?

बुमराह आणि शमी शिवाय उमेश यादव टीम इंडियाचा महत्वाचा वेगवान गोलंदाज आहे. पण या सीरीजसाठी तो टीममध्ये नाहीय. युवा गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केलय. ऑस्ट्रेलियापासून इंग्लंडपर्यंत सिराजने आपली छाप उमटवली आहे. सिराजच टीममध्ये खेळणं निश्चित आहे. पण सिराजशिवाय कोण? हा खरा प्रश्न आहे. टीम मॅनेजमेंटला कमीत कमी तीन वेगवान गोलंदाज निवडावे लागतील. यात सिराजच नाव निश्चित आहे, पण अन्य दोन कोण?

चौघांसाठी मोठी संधी

सिलेक्टर्सनी या दौऱ्यासाठी निवडलेल्या टीममध्ये एकूण पाच वेगवान गोलंदाज आहेत. टीममध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी आणि मुकेश कुमार आहेत. अन्य दोन स्थानांसाठी या चार गोलंदाजांमध्ये स्पर्धा असेल. सिराजसोबत याला संधी मिळेल

सिराजसोबत शार्दुल ठाकूरला सातत्याने संधी मिळाली आहे. शार्दुलला WTC फायनलमध्ये संधी मिळाली होती. ठाकूर वेळेला विकेट काढून देण्यासाठी ओळखला जातो. त्याशिवाय फलंदाजी सुद्धा करु शकतो. WTC फायनलच्या पहिल्या इनिंगमध्ये शार्दुलने 51 धावा केल्या होत्या. त्यामुळे सिराजसोबत तो दुसरा वेगवान गोलंदाज असू शकतो. जयदेव उनाडकट आणि मुकेश कुमारमध्ये जयदेवला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. कारण त्याच्याकडे अनुभव आहे.

Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल