IPLमधील सर्वात महागड्या खेळाडूच्या गर्लफ्रेंडकडे कोणती डिग्री आहे? कुठे झालं शिक्षण?

ऋषभ पंतच्या बहिणीचं म्हणजे साक्षीचं नुकतच दणक्यात लग्न झालं. हे लग्न चर्चेत आलं एमएस धोनीमुळे. धोनी आणि त्याच्या पत्नीने ऋषभच्या बहिणीच्या लग्नात ठेका धरला होता. त्यामुळे सोशल मीडियात धोनीच्या या नव्या आवताराची चर्चा सुरू होती. आता पुन्हा एकदा या लग्नाची चर्चा सुरू आहे. या लग्नात चक्क ऋषभची कथित गर्लफ्रेंड आली होती. त्यामुळे आता तिची चर्चा सुरू झाली आहे.

IPLमधील सर्वात महागड्या खेळाडूच्या गर्लफ्रेंडकडे कोणती डिग्री आहे? कुठे झालं शिक्षण?
Isha Negi
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 14, 2025 | 1:51 PM

IPL Indian player, Rishabh Pant Girl Friend : ऋषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू आहे. गेल्या सीजनमध्ये झालेल्या लिलावात लखनऊ सुपर जायंट्सने त्याला 27 कोटी रुपयात खरेदी केलं होतं. त्यामुळे तो बराच चर्चेत आला होता. आताही ऋषभ पंत चर्चेत आला आहे. ऋषभची बहीण साक्षी पंतचा नुकताच विवाह झालाय. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याच लग्नात ऋषभची रुमर्ड गर्लफ्रेंडचीही बरीच चर्चा होती. ती सुद्धा या लग्नाला उपस्थित होती. ऋषभ पंतची ही कथित गर्लफ्रेंड कोण आहे? ती कुठे शिकली? तिच्याकडे कोणत्या डिग्र्या आहेत याचीच माहिती घेऊया.

ईशा नेगी असं ऋषभच्या या कथित गर्लफ्रेंडचं नाव आहे. ईशा सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. तिचं सौंदर्श आणि फॅशन सेन्समुळे तिची नेहमीच चर्चा असते. ईशाचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत. तिच्या स्टाईलवर तिचे चाहते फिदा आहेत.

ईशा मूळची मुंबईची

ऋषभ पंतची कथित गर्लफ्रेंड ईशा नेगी ही मूळची मुंबईकर आहे. तिचा जन्म मुंबईचा. 20 फेब्रुवारी 1997ला तिचा जन्म झाला. तिचे वडील एक मोठे बिझनेसमॅन आहेत. ईशाने तिचं शिक्षण डेहराडूनच्या कॉन्व्हेंट ऑफ जीसस एंड मेरीमधून घेतलं आहे. त्यानंतर तिने नोएडातील एका प्रायव्हेट यूनिव्हर्सिटीतून तिने इंग्रजी विषयात बीएची डिग्री घेतली आहे.

वाचा: सत्या बोल की रं माझ्याशी; अक्षय खन्नाबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर संतोष जुवेकरवर मीम्सचा वर्षाव

इंटिरियर डिझायनर

मीडिया रिपोर्टनुसार, ईशा नेगी एक इंटरियर डिझायनर आणि इंटरप्रेन्योर आहे. त्याशिवाय ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडलही आहे. इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर ती नेहमी अॅक्टिव्ह असते. तिचे फोटो सातत्याने शेअर करत असते. चेन्नई टेस्टवेळी तिचा ऋषभ पंतसोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर ईशा नेगी ही ऋषभची गर्लफ्रेंड असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. जेव्हा ऋषभचा रस्ते अपघात झाला होता, तेव्हा ईशाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून त्याला फायटर संबोधलं होतं.

आता चर्चा का?

सध्या ईशा प्रचंड चर्चेत आहेत. ऋषभची बहीण साक्षीच्या लग्नाला ईशा गेली होती. तिने तिच्या सोशल मीडियावरून नवरदेव आणि नवरीचे फोटो तसेच व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामुळेच तिचं आणि ऋषभचं काही तरी झेंगाट सुरू आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.