भारत-बांगलादेश सामना सुरु असताना शिखर धवनसोबत दिसलेली मिस्ट्री गर्ल कोण? जाणून घ्या सर्वकाही

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत विरुद्ध बांग्लादेश सामना पाहण्यासाठी शिखर धवन दुबईला गेला होता. शिखर धवन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा ब्रँड अम्बेसडर आहे. पण त्याच्यासोबत सामना पाहताना एक मिस्ट्री गर्ल दिसली. तिची आता चर्चा होत आहे.

भारत-बांगलादेश सामना सुरु असताना शिखर धवनसोबत दिसलेली मिस्ट्री गर्ल कोण? जाणून घ्या सर्वकाही
| Updated on: Feb 21, 2025 | 3:30 PM

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात भारताने बांगलादेशला 6 विकेट राखून पराभूत केलं. बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 229 धावांचं लक्ष ठेवलं होतं. हे लक्ष्य भारताने 21 चेंडू आणि 6 विकेट राखून गाठलं. या सामन्यात शुबमन गिल आणि मोहम्मद शमी हे हिरो ठरले. मोहम्मद शमीने पाच विकेट, तर शुबमन गिलने शतक ठोकून विजयात मोलाचा हातभार लावला. पण असं असताना चॅम्पियन्स ट्रॉफीचा ब्रँड अम्बेसडर असलेला शिखर धवन चर्चेत आला आहे. शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर लीजेंड्स ट्रॉफीत खेळताना दिसला. चॅम्पियन्स ट्रॉफीत शिखर धवन एका विदेशी महिलेसोबत बसलेला दिसला. त्यामुळे ही मिस्ट्री गर्ल नेमकी कोण? याची चर्चा रंगली आहे. शिखर धवनच्या वैयक्तिक आयुष्यात बरीच उलथापालथ झाली आहे. नुकताच त्याचा घटस्फोटही झाला आहे. असं असताना पुन्हा एकदा विदेशी महिलेला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

शिखर धवन काही दिवसांपूर्वी विदेशी महिलेसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाला होता. नोव्हेंबर 2024 रोजी दोघं एकत्र दिसले होते. आता पुन्हा एकदा शिखर धवन मिस्ट्री गर्लसोबत भारत बांग्लादेश सामना पाहताना दिसला. मिडिया रिपोर्ट आणि सोशल मीडियावरील चर्चेनुसार सदर महिलेचं नाव हे सोफी आहे. शिखर धवन तिला इंस्टाग्रामवरही फॉलो करतो. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्री आहे यात काही शंका नाही. पण ते एकमेकांना डेट करतात की फक्त सामना पाहण्यासाठी एकत्र आले होते हे सांगणं कठीण आहे. पण त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

शिखर धवनने 2012 मध्ये त्याच्यापेक्षा वयाने मोठी असलेल्या आयेशा मुखर्जीशी लग्न केले. दोघांनाही एक मुलगा आहे. काही काळापूर्वी धवन आणि आयेशा वेगळे झाले आहेत. तेव्हापासून धवन एकाकी जीवन जगत आहे. धवनचा मुलगा त्याच्या आईसोबत ऑस्ट्रेलियात राहतो. न्यायालयाने मुलाचा ताबा आयशा मुखर्जीला दिला असला तरी, धवनला त्याच्या मुलाला भेटण्यावर कोणतेही बंधन नाही. पण धवनने गेल्या दोन वर्षांपासून त्याचा मुलाला पाहिलेला नाही.