AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजू सॅमसनच्या जर्सीवर का लिहिलंय DHONI? काय आहे कारण ते जाणून घ्या

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी संजू सॅमसनची संघात निवड झाली आहे. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल की नाही याबाबत शंका आहे. दरम्यान, संजू सॅमसन केरळ क्रिकेट लीग स्पर्धेत खेळत आहे. येथे त्याने शतक ठोकलं, पण त्याची जर्सी चर्चेत आली आहे.

संजू सॅमसनच्या जर्सीवर का लिहिलंय DHONI? काय आहे कारण ते जाणून घ्या
संजू सॅमसनच्या जर्सीवर का लिहिलंय DHONI? काय आहे कारण ते जाणून घ्याImage Credit source: X/KCL
| Updated on: Aug 25, 2025 | 5:14 PM
Share

आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाने जोरदार तयारी सुरु केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाची घोषणा झाली असून संजू सॅमसनचा समावेश झाला आहे. पण शुबमन गिलच्या एन्ट्रीमुळे त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळेल की नाही अशी शंका आहे. दुसरीकडे, संजू सॅमसन केरळ क्रिकेट लीग स्पर्धेदरम्यान चर्चेत आला आहे. कोच्चि ब्लू टायगर्सकडून खेळताना त्याने शतक ठोकलं आणि प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवण्याचा दावा ठोकला आहे. याच सामन्यात शेवटच्या चेंडूवर कोच्चि ब्लू टायगर्स संघाला विजयही मिळाला. पण असं सर्व असताना संजू सॅमसनच्या जर्सीने लक्ष वेधून घेतलं. कारण संजू सॅमसनच्या जर्सीवर ‘धोनी’ नाव लिहिलं होतं. त्यामुळे हे नाव वाचून चाहत्यांना धक्का बसला. संजू सॅमसनच्या जर्सीवर धोनी हे नाव कसं आणि का छापलं? असा प्रश्न पडला. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर जाणून घेऊयात..

संजू सॅमसनच्या जर्सीवर धोनीचे नाव का लिहिले आहे?

कोच्चि ब्लू टायगर्स जर्सीवर छापलेलं नाव हे स्पॉन्सर आहे. हा धोनी एपचा लोगो आहे. हा संघाचा अधिकृत प्रायोजक आहे. सर्व खेळाडूंच्या जर्सीवर हा लोगो आहे. तसाच तो संजूच्या जर्सीवरही आहे. त्यामुळे त्यात वेगळं असं काही नाही. धोनी एप क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने लाँच केलं आहे. धोनीने सुरु केलेलं एक लॉयल्टी आणि फॅन एंगेजमेंट प्लॅटफॉर्म आहे. धोनीच्या आयुष्यातील खास क्षण त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी हे व्यासपीठ तयार केलं आहे. हे एप सोशल मिडिया प्लॅटफॉर्मसारखं काम करतं. गुगल प्ले स्टोरवरून तुम्ही मोफत डाऊनलोड करू शकता.

केरळ क्रिकेट लीग स्पर्धेतील संजू सॅमसन हा सर्वात महागडा खेळाडू आहे. 2025 केसीएल लिलावात कोची ब्लू टायगर्सने त्याच्यासाठी 26.75 लाखांची रक्कम मोजली. त्यामुळे या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला. विशेष म्हणजे तो खेळत असलेल्या संघाचं नेतृत्व त्याचा मोठा भाऊ सॅली सॅमसन करत आहे. दरम्यान, एरिस कोल्लम सेलर्सविरुद्ध खेळताना त्याने शतक ठोकलं. त्याने 51 चेंडूत 121 धावा केल्या. त्यात त्याने 14 चौकार आणि 7 षटकार मारले.

Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?