AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What is Boxing Day Test: भारत-दक्षिण आफ्रिकेतील टेस्ट मॅचला बॉक्सिंग डे का म्हटले जातय?

What is Boxing Day Test: भारतीय क्रिकेट प्रेमींचे लक्ष आता 26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या भारत आणि आफ्रिकेतील सामन्याकडे लागले आहे. हा सामना बॉक्सिंग डेला होत आहे. या दिवशी क्रिकेटचे स्टेडियम खचाखच गर्दीने भरलेले असते.

What is Boxing Day Test: भारत-दक्षिण आफ्रिकेतील टेस्ट मॅचला बॉक्सिंग डे का म्हटले जातय?
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 24, 2023 | 10:09 AM
Share

नवी दिल्ली, दि.24 डिसेंबर | भारत आणि दक्षिण आफ्रिकेत 26 डिसेंबरपासून कसोटी सामना सुरु होत आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेतील सेंचुरियन मैदानावर खेळवण्यात येणार आहे. तसेच पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियात मेलबर्न येथे 26 डिसेंबरपासून कसोटी सामना होणार आहे. हे दोन्ही सामने बॉक्सिंग डेला खेळवले जाणार आहे. बॉक्सिंग डेला क्रिकेटचे स्टेडियम खचाखच प्रेक्षकांच्या गर्दीने भरलेले असते. प्रेक्षकांचा उत्साह मोठा असतो. परंतु क्रिकेट आणि बॉक्सिंगचा काही संबंध नसतो. मग का म्हटले जातेय बॉक्सिंग डे सामना…

काय आहे बॉक्सिंग डे ?

बॉक्सिंग डे म्हणजे मुष्टीयुद्ध आणि क्रिकेटचा काही संबंध नाही. संबंध 26 डिसेंबर या तारखेशी आहे. 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जातो. त्यानंतर येणारा दुसऱ्या दिवसाला बॉक्सिंग डे म्हटले जाते. बॉक्सिंग डे त्या लोकांना समर्पित केले जाते, जे 25 डिसेंबर रोजी सुटी न घेता काम करत असतात. बॉक्सिंग डे च्या दिवशी लोकांना भेटवस्तू देऊन आभार व्यक्त केले जाते. थोडक्यात नाताळनंतर येणाऱ्या दुसऱ्या दिवसाला बॉक्सिंग डे म्हटले जाते.

इतर खेळात बॉक्सिंग डे

क्रिकेटशिवाय इतर खेळात बॉक्सिंग डे सामने खेळले जातात. बॉक्सिंग डे सामन्याला सुरुवात 1892 मध्ये झाली. ऑस्ट्रेलियात देशातंर्गत टुर्नामेंटमध्ये हा सामना खेळाला गेला. भारतीय संघ आतापर्यंत 17 बॉक्सिंग डे सामने खेळला आहे. आतापर्यंत भारताला बॉक्सिंग डे सामन्यांत यश मिळाले नाही. आता ही परंपरा यंदा टीम इंडिया मोडणार का? हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

टीम इंडियाचे बॉक्सिंग डे टेस्ट (26 डिसेंबर रोजी झालेले सामने)

  • 1985- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, मॅच ड्रॉ, मेलबर्न
  • 1987- भारत विरुद्ध वेस्टइंडीज, कोलकाता, मॅच ड्रॉ
  • 1991- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून सामना जिंकला , मेलबर्न
  • 1992- दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, दक्षिण आफ्रिका 9 गडीने विजयी, पोर्ट एलिजाबेथ
  • 1996- दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, आफ्रिका 328 धावांनी विजयी, डरबन
  • 1998- न्यूझीलँड विरुद्ध भारत, न्यूजीलँड 4 गडीने विजयी, वेलिंगटन
  • 1999- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, ऑस्ट्रेलिया 180 धावांनी विजयी, मेलबर्न
  • 2003- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, ऑस्ट्रेलिया 9 विकेटने विजय, मेलबर्न
  • 2006- दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, आफ्रिका 174 धावांनी विजयी, डरबन

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?