AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात साखळी फेरीत एकच सामना का? जाणून घ्या या मागचं समीकरण

आयपीएल 2024 स्पर्धेचं उर्वरित वेळापत्रकही जाहीर झालं आहे. सुरुवातीला प्रत्येक संघ एकमेकांसमोर उभा ठाकणार आहे. त्यानंतर पाच सामने पुन्हा एकदा त्याच संघांसोबत होतील. साखळी फेरीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ एकदाच भिडणार आहेत. या मागचं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला तर मग जाणून घेऊयात नेमकं कारण काय ते

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात साखळी फेरीत एकच सामना का? जाणून घ्या या मागचं समीकरण
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स साखळी फेरीत एकदाच भिडणार, कारण काय ते जाणून घ्याImage Credit source: Twitter
| Updated on: Mar 26, 2024 | 7:24 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेत एकूण 10 संघ आहेत. प्रत्येक संघ साखळी फेरीत एकूण 14 सामने खेळणार आहे. म्हणजेच एक संघ साखळी फेरीत 9 संघांना भिडणार आहे. त्यानंतर पाच सामन्यात पाच संघ रिपीट होतील. पण रिपीट होणारे पाच संघ निवडले तरी कसे जातात असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. कारण मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यासारखे दिग्गज संघ साखळी फेरीत एकदाच भिडणार आहे. हे गणित ठरतं तरी कसं? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. कारण हे दोन दिग्गज संघ 14 एप्रिलला भिडतील. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर प्लेऑफ किंवा अंतिम फेरीत हे संघ आमनेसामने येऊ शकतात. आयपीएल स्पर्धेत 10 संघ 2022 मध्ये आले. त्या आधी एकूण 8 संघ होते आणि प्रत्येक संघ दोनदा एकमेकांसमोर उभा ठाकत होता. मात्र आता फॉर्मेट बदलला असून नवीन पद्धतीने साखळी फेरीचे सामने खेळवले जातात.

2022 मध्ये गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन संघ सामील झाले. त्यानंतर पाच पाच संघांचे दोन गट पाडले गेले. आयपीएल 2023 आणि 2024 स्पर्धेतही हे दोन गट कायम आहेत. त्यामुळे आपल्या गटातील संघासोबत प्रत्येकी दोन सामने खेळेल. म्हणजेच आठ सामने होतील. त्यानंतर उर्वरित सहा सामन्यासाठी दुसऱ्या गटातील पाच संघांशी प्रत्येकी एक सामना होईल. तर एक सामना ड्रॉ आधारे दुसऱ्या गटातील एका संघासोबत डबल खेळला जाईल.

मुंबई इंडियन्स अ गटात असून यात दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स, आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आहेत. चेन्नई सुपर किंग्स ब गटात असून यात गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आहेत. आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यातही साखळी फेरीत एकच सामना होणार आहे. आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ दोनदा भिडणार आहेत. मुंबई इंडियन्स सनरायझर्स हैदराबादशी दोनदा भिडणार आहे.

मुंबई इंडियन्स शेड्युल

  • मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद – 27 मार्च, संध्याकाळी 7.30 वाजता, हैदराबाद
  • मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – 1 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, मुंबई
  • मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – 7 एप्रिल, दुपारी 3.30 वाजता, मुंबई
  • मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु- 11 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, मुंबई
  • मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – 14 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, मुंबई
  • मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स -18 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, मोहाली
  • मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – 22 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, जयपुर
  • मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – 27 एप्रिल दुपारी 3.30 वाजता, दिल्ली
  • मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स – 30 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, लखनऊ
  • मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स – 3 मे, संध्याकाळी 7.30 वाजता, मुंबई
  • मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद – 6 मे, संध्याकाळी 7.30 वाजता, मुंबई
  • मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स – 11 मे, संध्याकाळी 7.30 वाजता, कोलकाता
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना