AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs ENG 2nd T20 : वेस्ट इंडिज पलटवार करत बरोबरी करणार का?

West Indies vs England 2nd T20 : इंग्लंडने पहिल्या सामन्यात विंडिजवर मात करत विजयी सुरुवात केली. त्यामुळे यजमान विंडिजसमोर दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 ने बरोबरीत करण्याचं आव्हान असणार आहे.

WI vs ENG 2nd T20 : वेस्ट इंडिज पलटवार करत बरोबरी करणार का?
england and west indies captain
| Updated on: Nov 10, 2024 | 10:27 PM
Share

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेतील दुसरा सामना हा ब्रिजटाऊन येथील केसिंग्टन ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडने या मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. त्यामुळे विंडिजसमोर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. विंडिजच्या नेतृत्वाची धुरा ही रोव्हमॅन पॉवेल याच्या खांद्यावर आहे. तर जोस बटलर इंग्लंडची कॅप्टन्सी करणार आहे. या सामन्याला अवघ्या काही तासांनी सुरुवात होणार आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत एकूण 31 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये विंडिज वरचढ राहिली आहे. विंडिजने 17 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 14 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. तर इंग्लंडने 14 सामने जिंकलेत तर 17 गमावलेत.

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड दुसरा टी 20I सामना केव्हा?

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड दुसरा टी 20I सामना सोमवारी 11 डिसेंबरला होणार आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड दुसरा टी 20I सामना कुठे?

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड दुसरा टी 20I सामना ब्रिजटाऊन, केसिंग्टन ओव्हल येथे होणार आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टी 20I सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टी 20I सामन्याला भारतीय वेळेनुसार 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल.

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड दुसरा टी 20I सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड दुसरा टी 20I सामना मोबाईलवर फॅनकोड एपवर पाहायला मिळेल.

वेस्टइंडिज टीम : रोवमॅन पॉवेल (कॅप्टन), रोस्टन चेज, मॅथ्यू फोर्ड, शिमरोन हेटमायर, टेरेंस हिंड्स, शाई होप, अकील हुसैन, शमर जोसेफ, ब्रैंडन किंग, इविन लुईस, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसले, शेरफेन रूदरफोर्ड आणि रोमारियो शेफर्ड.

इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जोफ्रा आर्चर, जॅकब बेथेल, जोफ्रा आर्चर, जॉर्डन कॉक्स, सॅम करन, विल जॅक्स, लियाम लिविंगस्टोन, शाकिब महमूद, डॅन मूसली, जैमी ओवर्टन, आदिल राशिद, रेहान अहमद, फिल साल्ट, रीसी टॉपली आणि जॉन टर्नर.

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.