AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI 2nd T20 : निकोलस पूरन याचा तडाखा, विंडिज दुसऱ्या सामन्यात विजयी, टीम इंडियाची फ्लॉप कामगिरी

West Indies vs India 2nd T20I | वेस्ट इंडिजने सलग दुसऱ्या टी 20 सामन्यात विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

IND vs WI 2nd T20 : निकोलस पूरन याचा तडाखा, विंडिज दुसऱ्या सामन्यात विजयी, टीम इंडियाची फ्लॉप कामगिरी
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 07, 2023 | 12:45 AM
Share

गयाना | टीम इंडियाने सलग दुसऱ्या सामन्यातही माती खाल्लीय. विंडिजने टीम इंडियावर 2 विकेट्सने विजय मिळवला आहे.  टीम इंडियाने विंडिजला विजयसाठी 153 धावांचे आव्हान दिले होते. विंडिजने हे आव्हान 18.5 ओव्हरमध्ये 8 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.  विंडिजने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली. वेस्ट इंडिज संघाकडून निकोलस पूरन याने सर्वाधिक 67 धावा केल्या.

सामन्याचा संपूर्ण आढावा

टीम इंडियाकडून तिलक वर्मा याने सर्वाधिक धावा केल्या. तिलकने 41 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. तिलक वर्मा याचं पहिलंवहिलं आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठरलं. ईशान किशन याने 23 बॉलमध्ये 27 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन हार्दिकने 24 धावा जोडल्या. अक्षर पटेल 14 रन्स करुन माघारी परतला. रवि बिश्नोई याने 8 आणि अर्शदीप सिंह याने नाबाद 6 धावा केल्या.

वेस्ट इंडिज संघ या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, संघाची सुरूवात खराब झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये दोन महत्त्वाच्या विकेट्स गेल्या. कर्णधार हार्दिक पंड्याने पहिल्याच बॉलवर ब्रेंडन किंग याला शून्यावर पाठवलं. त्यापाठोपाठ जॉनसन चार्ल्सही आऊट झाला. टीम इंडिया सामन्यामध्ये पकड मिळवणार असं वाटत होतं, मात्र निकोलस पूरन याने आपल्या तोडफोड फलंदाजीने सामना विंडिजच्या बाजूने झुकवला होता. पूरन याने 40 बॉलमध्ये 67 धावा केल्या होत्या मात्र मुकेश कुमारने त्याला आऊट करत सामना झुकवला.

126 वर 4 विकेट्स असणाऱ्या विंडिजची अवस्था 129 वर 8 अशी झाली होती. मात्र अकील होसैन आणि अल्जारी जोसेफ यांनी संघाला विजय मिळवून दिला. आता 5 सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिज संघाने 2-0 ने आघाडी घेतली. टीम इंडियाला तिसरा सामना जिंकावाच लागणार आहे. नाहीतर मालिका गमवावी लागू शकते.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोवमॅन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉनसन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, अल्जारी जोसेफ आणि ओबेड मॅकॉय.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?