WI vs IND 2nd Test | विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून मराठी खेळाडूचा पत्ता कट, नक्की कारण काय?

WEST INDIES vs TEAM INDIA 2nd Test | वेस्ट इंडिजने दुसऱ्या कसोटी सामन्यात टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

WI vs IND 2nd Test | विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून मराठी खेळाडूचा पत्ता कट, नक्की कारण काय?
| Updated on: Jul 20, 2023 | 8:09 PM

त्रिनिदाद | वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टॉस जिंकला आहे. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. विंडिज कॅप्टन क्रेग ब्रॅथवेट याने टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. टीम इंडियाने या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल केला आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने मुंबईकर खेळाडूचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केलेला नाही. त्यामुळे मुंबईकर खेळाडूच्या जागी युवा क्रिकेटरला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

शार्दुल ठाकूर दुखापतीमुळे ‘आऊट’

शार्दुल ठाकूर विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. शार्दुलला डाव्या मांडीला त्रास जाणवत होता. शार्दुल या मांडीच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्साठी सेलेक्शनसाठी उपलब्ध नव्हता. त्यामुळे शार्दुलला दुसऱ्या टेस्टमधून बाहेर व्हावं लागलंय. अशी माहिती बीसीसीआयने ट्विटद्वारे दिली आहे.

मुकेश कुमार याचं कसोटी पदार्पण

दरम्यान शार्दुल ठाकूर याच्या जागी युवा मुकेश कुमार याला संधी देण्यात आली आहे. मुकेश याचं यासह कसोटी पदार्पण झालंय. विंडिज विरुद्धच्या या मालिकेत मुकेश टीम इंडियाकडून पदार्पण करणारा तिसरा खेळाडू ठरलाय. याआधी पहिल्या सामन्यात टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल आणि ईशान किशन या दोघांनी टेस्ट डेब्यू केला होता.

विराट कोहली याचा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना

दरम्यान विराट कोहली याने विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी मैदानात उतरताच मोठा कारनामा केला आहे. विंडिज विरुद्धची दुसरी टेस्ट ही विराट कोहली याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 500 वा सामना ठरला आहे. विराटने 111 कसोटी, 274 वनडे आणि 115 टी सामने खेळले आहेत.

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंदरपॉल, जर्मेन ब्लॅकवुड, अलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन आणि शॅनन गॅब्रिएल.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.