AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND 3rd Odi | Ishan Kishan याचा झंझावात, विंडिज विरुद्ध सलग 3 सामन्यात 3 अर्धशतक

Ishan kishan West Indies vs India 3rd Odi | वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात ईशान किशन याने मोठा रेकॉर्ड केलाय.

WI vs IND 3rd Odi | Ishan Kishan याचा झंझावात, विंडिज विरुद्ध सलग 3 सामन्यात 3 अर्धशतक
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Aug 01, 2023 | 8:55 PM
Share

त्रिनिदाद | टीम इंडियाचा युवा आणि विकेटकीपर ओपनर बॅट्समन ईशान किशन याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक ठोकलंय. ईशानने गुडकेश मोती याच्या बॉलिंगवर 14 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर एक धाव घेत अर्धशतक पूर्ण केलं. ईशानने 43 चेंडूंच्या मदतीने हे अर्धशतक ठोकलं. विशेष बाब म्हणजे ईशानचं वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील सलग तिसरं अर्धशतक ठरलं. तसेच ईशानने ही तिन्ही अर्धशतकं सलामीला येत ठोकली आहेत. ईशानने या अर्धशतकासह मोठा विक्रम केला आहे.

ईशानने याआधी विंडिज विरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात 46 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 7 चौकारांच्या मदतीने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर दुसऱ्या सामन्यात 55 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 6 चौकारांच्या मदतीने 55 रन्स केल्या. तर आता तिसऱ्या सामन्यात ईशान 43 बॉलच्या मदतीने हे अर्धशतक केलं. ईशानच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे सहावं अर्धशतक ठरलं.

‘ईशान’दार कामगिरी

ईशान सहावा भारतीय

दरम्यान ईशान किशन हा 3 सामन्यांच्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत सलग 3 अर्धशतक करणारा एकूण सहावा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी टीम इंडियाकडून के श्रीकांत, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अझरुद्दीन, महेंद्र सिंह धोनी आणि श्रेयस अय्यर या 5 जणांनी हा कारनामा केला होता.

ईशान पुन्हा चुकला

ईशानने सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतक ठोकत विक्रम केला. मात्र ईशानने गेल्या 2 सामन्यात केलेली चूक पुन्हा केली. ईशानला अर्धशतकाचं शतकात रुपांतर करण्यात पुन्हा अपयशी ठरला. ईशान 77 धावा करुन आऊट झाला. ईशानने 64 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 8 चौकारांच्या मदतीने 77 धावांची खेळी केली.

तिसऱ्या सामन्यात 2 बदल

दरम्यान तिसऱ्या सामन्यात टीम इंडियात 2 बदल करण्यात आले आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना तिसऱ्या सामन्यातही विश्रांती दिली गेलीय. तर अक्षर पटेल आणि उमरान मलिक यांच्या जागी ऋतुराज गायकवाड आणि जयदेव उनाडकट या दोघांना संधी देण्यात आली आहे.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुकेश कुमार आणि जयदेव उनाडकट.

विंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), कायल मेयर्स, ब्रँडन किंग, एलिक एथनेज, शिमरॉन हेटमायर, रोमारियो शेफर्ड, केसी कार्टी, यानिक कॅरिया, अल्झारी जोसफ, जेडन सील्स आणि गुडकेश मोती.

Follow Us
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?