IND vs WI 3rd T20: जबरदस्त! एक वेगवान चेंडू, त्यावर सूर्यकुमारचा तितकात दमदार अप्पर कट, पहा VIDEO

| Updated on: Aug 03, 2022 | 10:49 AM

IND vs WI 3rd T20: भारताने मंगळवारी वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यात विजय मिळवला. भारताने या विजयासह दुसऱ्या टी 20 सामन्यातील पराभवाचा बदला घेतला.

IND vs WI 3rd T20: जबरदस्त! एक वेगवान चेंडू, त्यावर सूर्यकुमारचा तितकात दमदार अप्पर कट, पहा VIDEO
Follow us on

मुंबई: भारताने मंगळवारी वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यात विजय मिळवला. भारताने या विजयासह दुसऱ्या टी 20 सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत भारत आता 2-1 ने आघाडीवर आहे. सूर्यकुमार यादव या विजयाचा हिरो ठरला. त्याच्या फलंदाजीच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजला नमवलं. या सामन्यात सूर्यकुमार यादव वेगवान गोलंदाज अल्जारी जोसेफच्या चेंडूवर एक शॉट खेळला. तो पाहिल्यानंतर निश्चितच तुमच्या तोंडून कौतुकाचे शब्द बाहेर पडतील. अल्जारी जोसेफने बाऊन्सर चेंडू टाकला. समोर स्ट्राइकवर सूर्यकुमार यादव होता. थेट सूर्यकुमारच्या तोंडाच्या दिशेने तो चेंडू आला. त्यावर सूर्यकुमार यादवने ज्या पद्धतीचा फटका खेळला, निश्चितच गोलंदाजाने त्याची कल्पना केली नसेल.

सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिज विरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात 44 चेंडूत 76 धावा फटकावल्या. त्याच्या इनिंग दरम्यान स्ट्राइक रेट 172 पेक्षा जास्त होता. त्याने 8 चौकार आणि 4 षटकार लगावले. या इनिंगने टीमच्या विजयाचा पाया रचला.

भारताच्या डावात 10 व्या षटकात सूर्यकुमार विरुद्ध जोसेफ

भारत आणि वेस्ट इंडिज टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादव 61 धावांवर खेळत होता. त्यावेळी सामन्यात 10 वं षटक सुरु होतं. त्याचवेळी सूर्यकुमार यादवच्या चेहऱ्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. अल्जारी जोसेफ 10 वी ओव्हर टाकत होता. त्याने या ओव्हर मधील शेवटचा चेंडू बाऊन्सर टाकला. हा चेंडू थेट सूर्यकुमारच्या चेहऱ्यावर आदळला असता, पण आधीच त्याने तो चेंडू हेरला होता.

हा फटका पाहणारा प्रत्येकजण दंग झाला

सूर्यकुमार यादवने 10 व्या षटकातील तो शेवटचा चेंडू नुसता ओळखलाच नाही, तर खूप सुंदर पद्धतीने त्याला उत्तरही दिलं. तोंडाच्या दिशेने आलेल्या या बाऊन्सवर सूर्यकुमार यादव अप्पर कटचा फटका खेळला. थर्ड मॅनवरुन हे चेंडू थेट सीमापार गेला. हा फटका पाहणारा प्रत्येकजण दंग झाला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलेल्या दिग्गजांनी सुद्धा सूर्यकुमारच कौतुक केलं.