WI vs SA 2nd Test : विंडिजला विजयासाठी 263 धावांचं आव्हान, दक्षिण आफ्रिका रोखणार?

West Indies vs South Africa 2nd Test: वेस्ट इंडिजकडे दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. दक्षिण आफ्रिकेने यजमानांना 263 धावांचं आव्हान दिलं आहे.

WI vs SA 2nd Test : विंडिजला विजयासाठी 263 धावांचं आव्हान, दक्षिण आफ्रिका रोखणार?
west indies vs south africa
Image Credit source: ProteasMenCSA X Account
| Updated on: Aug 17, 2024 | 10:08 PM

दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी विजयासाठी 263 धावांचं आव्हान दिलं आहे. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 80.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 246 धावा केल्या. तसेच दक्षिण आफ्रिकेकडे पहिल्या डावातील 16 धावांची आघाडी होती. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे विंडिजला 263 धावांचं आव्हान दिलं. आता विंडिजकडे हे आव्हान पूर्ण करण्यासाठी तिसऱ्या दिवसातील 2 सत्र आणि चौथा आणि पाचवा दिवस आहे. उभयसंघातील पहिला सामना हा अनिर्णित राहिला. त्यामुळे ही 2 सामन्यांची मालिका सध्या 0-0 ने बरोबरीत आहे.त्यामुळे आता दोन्ही संघांना दुसरा आणि अंतिम सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे. आता यात कोण यशस्वी ठरतं? याकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव

दक्षिण आफ्रिकेसाठी दुसऱ्या डावात काइल वेरेन आणि एडन मारक्रम या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. विकेटकीपर बॅट्समन वेरेन याने 78 बॉलमध्ये 8 फोरसह 59 रन्स केल्या. तर एडन मारक्रम याने 108 चेंडूत 6 चौकारांसह 51 धावांची खेळी केली. ओपनर टोनी डी झॉर्झी याने 39 तर विआन मुल्डरने 34 धावांचं योगदान दिलं. तर ट्रिस्टन स्टब्सने 24 धावांची भर घातली. तिघांना खातंही उघडता आलं नाही. तर तिघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. विंडिजसाठी जेडेन सील्स याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तर गुडाकेश मोती आणि जोमेल वॉरिकन या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स जेडेनला चांगली साथ दिली.

त्याआधी विंडिजला पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या 160 धावांचा पाठलाग करताना 42.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 144 धावाच करता आल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 16 धावांची आघाडी मिळाली.

विंडिजसमोर 263 धावांचं आव्हान

वेस्ट इंडीज प्लेइंग ईलेव्हन : क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), मिकाईल लुईस, केसी कार्टी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जेसन होल्डर, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), गुडाकेश मोटी, जोमेल वॉरिकन, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डी झॉर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, केशव महाराज, डेन पिएड, कागिसो रबाडा आणि नांद्रे बर्गर.