
आशिया कप 2025 स्पर्धेत 14 सप्टेंबरला भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात भारताचं पारडं तसं पाहीलं तर जड आहे. दुसरीकडे जसप्रीत बुमराहचं तगडं आव्हान असणार आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण जसप्रीत बुमराहचं आव्हान पेलणं आतापर्यंत पाकिस्तान संघाला काही जमलं नाही. टी20 क्रिकेट आंतरराष्ट्रीय सामन्यात आतापर्यंत बुमराहचा सामना करताना पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे पाय लटपटत असल्याचं दिसून आलं आहे. तसं पाहीलं तर क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. काही विक्रम मोडीत निघतात, काही रचले जातात. पण जसप्रीत बुमराहचं आव्हान पेलणं आतापर्यंत तरी पाकिस्तानला शक्य झालेलं नाही. म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. तर त्याचं उत्तर आहे षटकार… जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानी फलंदाजांना जमलेलं नाही. त्याला आतापर्यंत एकही षटकार पडलेला नाही. त्यामुळे जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला की विकेट वाचवणं हीच प्राथमिकता असल्याचं दिसून आलं आहे.
आशिया कप स्पर्धा टी20 फॉर्मेटमध्ये खेळली जाणार आहे. जसप्रीत बुमराहने पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 391 चेंडू टाकले आहेत. पण यापैकी एकाही चेंडूवर षटकार मारलेला नाही. जसप्रीत बुमराह जेव्हा जेव्हा गोलंदाजीला समोर उभा ठाकला तेव्हा पाकिस्तानी संघाला षटकार मारणं काही जमलं नाही. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत हे आव्हान पाकिस्तानी खेळाडूंसमोर असणार आहे. त्यामुळे पाकिस्तानचे फलंदाज जसप्रीत बुमराहच्या 24 चेंडूवर षटकार मारणार का? हा प्रश्न आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींचं लक्ष याकडे लागून असणार आहे.
आशिया कप स्पर्धेच्या प्लेइंग 11 मध्ये जसप्रीत बुमराह खेळणार हे निश्चित आहे. चार षटकं टाकणं ही काय बुमराहसाठी मोठी गोष्ट नाही. त्यात जसप्रीत बुमराह संघात असणं टीम इंडियासाठी चांगलं आहे. कारण यामुळे आशिया कप जिंकण्यांची संधी आणखी वाढते. जसप्रीत बुमराह प्लेइंग 11 मध्ये असताना भारताने एकही सामना गमावलेला नाही. बुमराह आतापर्यंत 12 सामने खेळला असून प्रत्येक सामन्यात त्यानेविकेट काढली आहे. किमान एक विकेट तरी घेतलीच आहे.