हिटमॅनचा खेळ संपला की संधी मिळणार? वेस्टइंडिज मालिकेसाठी अजित आगरकर काय पाऊल उचलणार?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी 16 सप्टेंबरला भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या संघात रोहित शर्मा असणार की नाही? या बाबत उत्सुकता आहे.

हिटमॅनचा खेळ संपला की संधी मिळणार? वेस्टइंडिज मालिकेसाठी अजित आगरकर काय पाऊल उचलणार?
हिटमॅनचा खेळ संपला की संधी मिळणार? वेस्टइंडिज मालिकेसाठी अजित अगरकर काय पाऊल उचलणार?
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 15, 2026 | 3:15 PM

भारत 27 सप्टेंबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड 16 सप्टेंबर रोजी होण्याची दाट शक्यता आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्या निवडीबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण क्रीडा जगताचे लक्ष लागले आहे. या आगामी मालिकेत सर्वात मोठा प्रश्न रोहित शर्माच्या निवडीचा आहे. जर रोहितची या संघात निवड झाली, तर पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी त्याची दावेदारी अधिक मजबूत होईल. रोहितने स्वतः विश्वचषकात खेळण्याची इच्छा स्पष्ट केली आहे, पण निवड समितीला काय हवे आहे, हा एक मोठा पेच आहे.

रोहित शर्माचं काय होणार?

गेल्या जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यादरम्यान निवड समितीला रोहित शर्मा संघात नको असल्याचे वृत्त समोर आले होते, परंतु बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी या अफवा पूर्णपणे नाकारल्या होत्या. लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामन्यानंतर रोहित निवृत्त होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र रोहितने तिथे शानदार शतक झळकावून आपल्या फॉर्मचे चोख प्रत्युत्तर दिले होते. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याची निवड झाली तर वनडे वर्ल्डकप संघाचा भाग असेल असंच समजावं लागेल. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. यासाठी स्पर्धेच्या तयारीसाठी आणि संघ बांधणीसाठी आता फक्त एका वर्षांचा अवधी शिल्लक आहे.

हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत बीसीसीआय सतर्क

हार्दिक पांड्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळणार की नाही, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. तो पुढच्या आठवड्यापर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे. असं असलं तरी निवड समिती त्याच्या निवडीबाबत कोणतीही घाई करणार नाही, असं दिसत आहे. पांड्याला आगामी एकदिवसीय विश्वचषकात कोणत्याही परिस्थितीत खेळायचे असल्याने त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटवर विशेष लक्ष दिले जात आहे.

युवा खेळाडू आशियाई खेळांसाठी जापानला; ‘या’ फिरकीपटूंना मिळणार संधी?

नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे हे युवा खेळाडू आशियाई खेळांसाठी जापानला रवाना होत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे या एकदिवसीय मालिकेत इतर खेळाडूंना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फिरकी विभागाचा विचार केला तर या मालिकेत कृणाल पांड्या, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या अनुभवी त्रिकुटाचा संघात गांभीर्याने विचार केला जाण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us