AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kanpur Vineet Minocha murder case : सासऱ्यांची सुपारी देण्यापूर्वी सुनेने Google वर काय-काय शोधलं?, शालूच्या सर्च हिस्ट्रीतून धक्कादायक गुपित उलगडलं..

कानपूर विनीत मिनोचा हत्याकांडात पोलिसांकडून आता डिजीटल पुरावे तपासण्यात येत आहे. या प्रकरणाच्या तपासात जुन्हाय नोकराला कथितपणे लाखो रुपये देण्यात आल्याचं समोर आलं आहे. सून शालू हिने गुगलवर काय काय सर्च केलं तेही धक्कादायक सत्य आता उघड झालंय.

Kanpur Vineet Minocha murder case : सासऱ्यांची सुपारी देण्यापूर्वी सुनेने Google वर काय-काय शोधलं?, शालूच्या सर्च हिस्ट्रीतून धक्कादायक गुपित उलगडलं..
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 15, 2026 | 4:16 PM
Share

Kanpur Vineet Minocha murder case : कोट्याधीश औषध व्यापारी विनीत मिनोचा हत्येने अख्ख्या कानपूरमध्ये खळबळ माजली. या हत्याकांडाटचा तपास जसजसा पुढे जातोय, तसतसे त्यातून आरोपी सून शालू मिनोच्या हिच्या भूमिकेबाबत नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. कल्याणपूर ठाणे क्षेत्रात झालेल्या या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन मारेकऱ्यांसह विनीत यांची सून शालू हिलाही अटक केली, सध्या ती तुरूंगाच्या गजाआड आहे. शालूच्या मोबाईलच्या तपासात अशी सर्च हिस्टरी आणि चॅट्स सापडलेतस ज्यामुळे तिचा कथित हत्येशी संबंध असल्याचं समोर येतंय, असा दावा पोलिसांनी केलाय. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हा हत्येमुळे नव्हे तर हार्ट अटॅकतमुळे झालायं हे कसं दाखवावं किंवा तशी हत्या कशी करावी ? असं शालूने या घटनेआधी गुगलवर सर्च केलं हतं, असं पोलिसांनी सांगितलं. ही सर्च हिस्ट्री तपासात अतिशय महत्वाचा पुरावा ठरू शकते. तसेच शालूच्या मोबाईलमध्ये असलेल्या चॅटमधून देखील कथित कटाचे संकेत मिळाले आहेत. इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची तपासणी अद्याप सुरू असून हे पुरावे पुढे न्यायालयात सादर केले जाणार आहेत, असं पोलिसांनी नमूद केलं.

जुन्या नोकराला दिले लाखो रुपये

घरातील जुन्या नोकराला शालूने लाखो रुपयांची ऑफर दिली होती, असं पोलिस तपासात समोर आलं आहे. कोणालाही संशय येऊ नये तसेच त्यांचा मृत्यू हार्ट अटॅक वाटावा अशा प्रकारने विनीत मिनोचा यांची हत्या करण्यात यावी अश सूचना आरोपींना देण्यात आसी होती. मात्र त्यांनी जसा प्लान आखला तसं काहीच घडलं नाही. विनीत मिनोचा यांनी आरोपी विशाल आणि त्याच्या साधीदाराला विरोध केला, त्यामुळे दोघांनी त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये विनीत गंभीररित्या जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.

सासरे ठेवायचे खर्चावर नजर

पोलिसांच्या प्राथमिक तपासात या हत्येमागे कौटुंबिक वाद असल्याचंही समोर आलं. पोलिसांच्या सांगण्यानुसार, विनीत मिनोचा हे सुनेच्या खर्चांवर नजर ठेवत होते आणि तिच्या काही खर्चांवर आक्षेप घ्यायचे. त्यांना शालूबद्दल संशयही येऊ लागला होता. याच कारणामुळे त्यांनी आपल्या फ्लॅटमध्ये अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. खर्चांवर ठेवलेली नजर आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे शालू तिच्या सासऱ्यांवर नाराज होती, असा पोलिसांचा अंदाज आहे.तपासात हा कौटुंबिक वाद कथित हत्येच्या कटामागील एक महत्त्वाचे कारण मानलं जायतं.

घरात हत्या, दुसरीकडे सून-मुलगा करत होते पार्टी

ज्या रात्री विनीत यांची हत्या झाली तेव्हा त्याचा मुलगा आणि सून शालू हे घराबाहेर एका पार्टीत होते. त्या दोघांनी पार्टीत ड्रिंक्स घेतली, डान्सही केला आणि पहाटे तीनच्या सुमारास घरी आले. त्यानंतर विनीत यांची हत्या झाल्याचं उघड झालं, असं पोलिसांनी नमूद केलं.

24 तासांत लागला हत्येचा छडा

ही हत्या झाल्यावर 24 तासांच्या आत अनेक महत्वाचे पुरावे समोर आले होते. तपासादरम्यान आरोपी विशालची भूमिका समोर आली आणि त्याने शालूबद्दल माहिती दिली.त्यानंतर सून शालू हिला अटक करण्यात आली. आता पोलिस मोबाईल चॅट, गुगल सर्च हिस्ट्री आणि इतर इलेक्ट्ऱनिक पुराव्यांच्या आधारे केस मजबूत केली जात आहे.

Follow Us
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले; म्हणाले...
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पांचे दर्शन, पहा खास व्हिडीओ
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भाजपचा पलटवार!
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांसाठी 25 हजारांची मागणी