रोहित पुन्हा MI चा कॅप्टन होणार की आणखी काही सरप्राइज? मुंबईच्या एका पोस्टने चाहत्यांना बुचकळ्यात टाकलं

Rohit Sharma Lead Mumbai Indians Again: आगामी आयपीएल हंगामात हार्दिक पांड्या पंजाब किंग्सकडून खेळणार असला तरी, मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

रोहित पुन्हा MI चा कॅप्टन होणार की आणखी काही सरप्राइज? मुंबईच्या एका पोस्टने चाहत्यांना बुचकळ्यात टाकलं
Will Hitman Take Charge of Mumbai Indians Again
| Updated on: Nov 25, 2026 | 9:25 PM

आयपीएल 2027 च्या आधी मुंबई इंडियन्सच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. फ्रँचायझीने आज एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये एका हातात मुंबई इंडियन्सची कॅप दिसत आहे. या पोस्टमध्ये कोणत्याही खेळाडूचा चेहरा दिसत नाही, परंतु फोटोच्या शैलीमुळे सोशल मीडियावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत. चाहत्यांचा असा विश्वास आहे की, मुंबई इंडियन्स या फोटोद्वारे आपल्या नवीन कर्णधाराबद्दल एक मोठा संकेत देत आहे.

विशेष म्हणजे फोटोमध्ये ज्या प्रकारे त्याने टोपी धरली आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांना फ्रँचायझीच्या यशस्वी काळाची आठवण येते. परिणामी त्या पोस्टमुळे कर्णधारपदाबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली. जरी मुंबई इंडियन्सने अद्याप कर्णधाराच्या नावाची अधिकृत घोषणा केली नसली तरी, फ्रँचायझीने पोस्टद्वारे खेळाडूच्या नावाची पुष्टी करणारी कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही. त्यामुळे चाहते आणि क्रिकेट वर्तुळात कर्णधारपदाबद्दल अजूनही तर्कवितर्क लावले जात आहेत.

Loading...

मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केल्यावर या चर्चेला आणखी जोर आला. या पोस्टमध्ये कोणत्याही खेळाडूचा चेहरा दिसत नाही, पण क्रिकेट चाहते या फोटोबद्दल तर्कवितर्क लावत आहेत. चाहत्यांचा असा विश्वास आहे की, हा फोटो मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या पुनरागमनाचा संकेत असू शकतो. आयपीएल 2027 च्या तयारीदरम्यान मुंबई इंडियन्सची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आता सर्वांचे लक्ष फ्रँचायझीच्या पुढील अधिकृत घोषणेकडे लागले आहे. ज्यामुळे कर्णधारपदाभोवती सुरू असलेल्या अटकळांना पूर्णविराम लागू शकतो. मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने संपर्क साधल्यानंतर रोहित शर्माने कर्णधारपद पुन्हा स्वीकारण्यास सहमती दर्शवली आहे. फ्रँचायझीने अद्याप याची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही.

मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी अनेक नावांवर चर्चा झाली आहे. यामध्ये सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांचा समावेश आहे. काही माध्यमांच्या वृत्तांनुसार, तिलक वर्मा यांनाही कर्णधारपदासाठी एक संभाव्य पर्याय म्हणून पाहिले गेले होते. मात्र, आता असे वृत्त समोर येत आहे की, फ्रँचायझीने पुन्हा एकदा रोहित शर्माशी संपर्क साधला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us