IPL 2026 : इशान किशनला सनरायझर्स हैदराबाद ठेवणार की काढणार? या व्हिडीओतून सर्व काही समोर

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी ट्रेड विंडोच्या माध्यमातून रोज काही ना काही माहिती समोर येत आहे. त्यामुळे कोणत्या खेळाडूला रिलीज करणार आणि कोणाला घेणार याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. असं असताना इशान किशनबाबत एक अपडेट समोर आली आहे.

IPL 2026 : इशान किशनला सनरायझर्स हैदराबाद ठेवणार की काढणार? या व्हिडीओतून सर्व काही समोर
IPL 2026 : इशान किशनला सनरायझर्स हैदराबाद ठेवणार की काढणार? या व्हिडीओतून सर्व काही समोर
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 12, 2025 | 10:40 PM

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहे. पण अजूनही सर्वकाही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे चर्चांचं पेव फुटलं आहे. कोण कुठे जाणार याबाबत चर्चांचे फड रंगले आहेत. असं असताना सनरायझर्स हैदराबादचा विकेटकीपर बॅट्समन इशान किशनबाबत चर्चा रंगली होती. इशान किशन पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. इतकंच काय तर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी इशान किशनला संघात घेण्यात रूची दाखवल्याची चर्चा होती. पण सनरायझर्स हैदराबादने या सर्व चर्चांना एका व्हिडीओच्या माध्यमातून पूर्णविराम दिला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट आहे की, इशान किशनला फ्रेंचायझी काही सोडणार नाही. तसं पाहीलं तर इशान किशनसाठी आयपीएल 2025 काही खास गेलं नाही. सनरायझर्स हैदराबादने त्याला 11.25 कोटी रुपये खर्च करत संघात घेतलं होतं. पहिल्या सामन्यात त्याने 47 चेंडूत 106 धावा केल्या. पण त्यानंतर काही खास करू शकला नाही. 14 सामन्यात फक्त 354 धावाच केल्या.

सनरायझर्स हैदराबादने इशान किशनचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सनराझर्स हैदराबादने सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर 19 सेकंदांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात इशान किशन केशरी रंगाचा ट्रेनिंग किट परिधान केलेला दिसत आहे. यात त्यांनी त्यांच्या एक्स हँडलवर लिहिले आहे की, या खेळाडूच्या अंगावर केशरी रंग 24 कॅरेट सोन्यासारखा दिसतो. इशान किशनची इतकी स्तुती करत व्हिडीओ पोस्ट केला म्हणजे त्याला सोडणार नाही हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्याच्याबाबत उठलेला चर्चेचा धुराळा आता शांत झाला आहे.

आयपीएल स्पर्धेत इशान किशन मुंबई इंडियन्सकडून सात वर्षे खेळला. पण 2025 मेगा लिलावापूर्वी त्याला रिलीज करण्यात आलं. सनरायझर्स हैदराबादने त्याच्यासाठी मोठी बोली लावत त्याला संघात घेतलं. इशान किशन आतापर्यंत तीन संघाकडून खेळला आहे. पंजाब किंग्सनकडून त्याने आयपीएल करिअरला सुरुवात केली होती. इशान किशनने 119 सामन्यातील 112 डावात 2998 धावा केल्या आहेत. यात नाबाद 106 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.