
आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. असं असताना भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सी प्रायोजकत्वाबाबत पेच निर्माण झाला आहे. कारण केंद्र सरकारने ऑनलाईन मनी गेमिंगबाबत विधेयक पास केलं आणि ड्रीम 11 चा बाजार उठला आहे. त्यामुळे बीसीसीआयसोबतचा जर्सी स्पॉन्सरचा करार एक वर्षाआधीच संपला आहे. ड्रीम इलेव्हन आणि बीसीसीआयमध्ये 2023 मध्ये करार झाला होता. तीन वर्षांसाठी करार होता आणइ 2026 मध्ये संपणार होता. पण नव्या विधेयकामुळे व्यवसायच बंद झाला आहे. त्यामुळे कंपनीने या करारातून माघआर घेण्याच निर्णय घेतला आहे. तर बीसीसीआयने स्पष्ट केलं की, आम्ही स्वत: या कंपनीसोबत किंवा अशा कंपन्यांसोबत करार करू शकत नाही. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाला विना जर्सी प्रायोजक उतरावं लागणार आहे. जर बीसीसीआयने आशिया कप स्पर्धेपूर्वी करार केला तर हा प्रश्न सुटेल. पण नवा स्पॉन्सर शोधण्याचं आव्हान बीसीसीआयपुढे आहे. पण या प्रकरणात 65 हजार कोटीहून अधिक कमाई करणाऱ्या कंपनीचं नाव पुढे येत आहे. आशिया कप स्पर्धेसाठी दोन आठवड्यांचा अवधी शिल्लक असताना बीसीसीआयला हा पेच सोडवावा लागणार आहे.
आशिया कप स्पर्धेला दोन आठवडे शिल्लक असताना प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी टोयोटाने टीम इंडियाचं जर्सी स्पॉन्सरशिप घेण्यात रस दाखवला आहे. एका रिपोर्टनुसार, जापानची प्रसिद्ध कंपनी टोयोटा कंपनी भारताची टायटल स्पॉन्सर बनू इच्छित आहे. कंपनी सध्या भारतात टोयोटा किर्लोस्करसह भागीदारीत सुरु आहे. मागच्या आर्थिक वर्षात या कंपनीने 56500 कोटीहून अधिक कमावले होते. इतका मोठा टर्नओव्हर असलेली कंपनीने जर स्पॉन्सरशिपमध्ये रस दाखवला तर बीसीसीआय त्यावर विचार करू शकते. नुकतंच टोयोटा मोटर्सने इंग्लंड क्रिकेट संघाला टायटल स्पॉन्सर दिलं होतं. यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघासोबतही करार केला होता.
रिपोर्टनुसार, टोयोटा मोटर्सच नाही तर फिन टेक कंपनीने देखील स्पॉन्सरशिप देण्यात रस दाखवला आहे. पण या कंपनीचं नाव सध्या चर्चेत नाही. त्यामुळे बीसीसीआयकडे चांगले पर्याय आहेत. आता बीसीसीआय दोन आठवड्यात हा करार करणार का? असा प्रश्न समोर आला आहे. अन्यथा टीम इंडियाला विना स्पॉन्सर आशिया कप स्पर्धेत उतरावं लागणार आहे. जर तसं झालं तर बीसीसीआयला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे बीसीसीआयची या स्पर्धेपूर्वी धावपळ सुरु झाली आहे. भारताचा आशिया कप स्पर्धेत पहिला सामना 10 सप्टेंबरला ओमानविरुद्ध, 14 सप्टेंबरला दुसरा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.