आयपीएलमध्ये द्विशतक करशील का? या प्रश्नावर इशान किशन म्हणाला की…

मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यानंतर इशान किशन सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. फक्त सामन्यात इशान किशनने स्फोटक फलंदाजीचं दर्शन घडवलं. त्यामुळे त्याच्याकडून फार अपेक्षा वाढल्या आहेत. असं असताना त्याला द्विशतकाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने सकारात्मक उत्तर देत म्हणाला की..

आयपीएलमध्ये द्विशतक करशील का? या प्रश्नावर इशान किशन म्हणाला की...
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Mar 27, 2025 | 4:15 PM

आयपीएल 2025 स्पर्धेतील फलंदाजांचा आक्रमक अंदाज पाहून काही विक्रम रचले आणि मोडले जाणार यात काही शंका नाही. सनरायझर्स हैदराबाद संघाने तर या स्पर्धेत 300 धावांचा आकडा गाठण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बॅटिंग लाइनअप पाहता सहज शक्य होईल असं वाटत आहे. दुसरीकडे, इशान किशन सध्या जबरदस्त फॉर्मात असल्याचं दिसत आहे. इशानने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात आक्रमक खेळी करत द्विशतक झळकावलं. इशानने यावेळी 47 चेंडूत 6 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने नाबाद 106 धावा केल्या. इशानच्या स्फोटक फलंदाजीमुळे सनरायझर्स हैदराबादने या सामन्यात 20 षटकांत 286 धावा केल्या. त्यांनी हा सामनाही 44 धावांनी जिंकला. या विजयात इशान किशनची खेळी महत्त्वाची ठरली. एका मुलाखतीत बोलताना, इशान किशन म्हणाला की, सनरायझर्स हैदराबादसाठी त्याच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावल्याबद्दल तो आनंदी आहे. आगामी सामन्यांमध्येही ही कामगिरी सुरू ठेवण्याचा विश्वास त्याने व्यक्त केला.

इशान किशनकडून या स्पर्धेत आक्रमक खेळीची अपेक्षा आहे. दुसरीकडे इशान किशन द्विशतक झळकवेल असा विश्वास त्याच्या चाहत्यांना आहे. असं असताना त्याला द्विशतकाबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्याने त्याला सकारात्मक उत्तर दिलं. इशान किशनने उत्तर दिले की, “जर मला अशी संधी मिळाली तर मी नक्कीच दुहेरी शतक ठोकेन.” टी20 क्रिकेटमध्ये ही कामगिरी करण्याची त्याची इच्छा आहे, असंही तो पुढे म्हणाला. येत्या काळात एकदिवसीय सामन्यांमध्ये 250 ते 300 धावा करण्याची त्याची इच्छा असल्याचेही इशान किशनने सांगितले.

राजस्थान रॉयल्सला 44 धावांनी धोबीपछाड दिल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद नव्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. लखनौ सुपर जायंट्वविरुद्ध हा सामना होणार आहे. 27 मार्चला हा सामना होणार आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघात काही बदल होईल असं वाटत नाही. त्याच प्लेइंग 11 सह संघ मैदानात उतरण्याची शक्यता आहे. स्ट्राँग लाईनअप पाहता नाणेफेक जिंकल्यानंतर काय घ्यावं, असा प्रश्न मात्र लखनौ सुपर जायंट्सला पडेल यात काही शंका नाही.