WENG vs WIND : स्मृती मंधानाचं शतक, टीम इंडियाचं द्विशतक, इंग्लंडसमोर 211 धावांचं आव्हान
Womens England vs India 1st T20i : वूमन्स टीम इंडियाने पहिल्या टी 20i सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करत 200 पेक्षा अधिक धावा केल्या. भारताने 10.50 च्या रनरेटने 210 धावा केल्या. स्मृती मंधानाने भारताला 200 पार पोहचवण्यात प्रमुख भूमिका बजावली.

वूमन्स टीम इंडियाची कर्णधार स्मृती मंधाना हीने इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या टी 20i सामन्यात खणखणीत शतक झळकावलं. स्मृतीने केलेल्या खेळीमुळे टीम इंडियाला 200 पार मजल मारता आली आहे. टीम इंडियाने ट्रेंट ब्रिज नॉटिंघममध्ये यजमान इंग्लंडला विजयासाठी 211 धावांचं आव्हान दिलं आहे.भारताने 20 षटकांमध्ये 5 विकेट्स गमावून 210 रन्स केल्या. स्मृती व्यतिरिक्त हर्लीन देओल आणि दीप्ती शर्मा या दोघींनीही धावा केल्या. तर रिचा घोष हीनेही योगदान दिलं. भारतीय फलंदाजांनी त्यांची जबाबदारी पार पाडली. आता भारताला विजय मिळवून देण्याची जबाबदारी गोलंदाजांवर आहे. त्यामुळे गोलंदाजांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
टीम इंडियाची बॅटिंग
इंग्लंडने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी बोलावलं. भारताने या संधीचा फायदा घेत 200 प्लस स्कोअर केला. शफाली वर्मा आणि स्मृती या सलामी जोडीने टीम इंडियाला अप्रतिम सुरुवात करुन दिली. या दोघींनी 77 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शफाली 22 बॉलमध्ये 3 फोरसह 20 रन्स करुन आऊट झाली. त्यानंतर स्मृती आणि हर्लीन देओल या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी शानदार पार्टनरशीप केली. त्यामुळे 200 पार पोहचता आलं. या दोघींनी 94 रन्स जोडल्या. त्यानतंर हर्लीन 23 बॉलमध्ये 186.96 च्या स्ट्राईक रेटने 43 रन्सची वादळी खेळी केली.
स्मृती मंधानाचं ऐतिहासिक शतक
त्यानंतर स्मृतीने रिचा घोष हीच्यासह भारताला पुढे पोहचवलं. स्मृतीने या दरम्यान 16 व्या ओव्हरमध्ये चौकारासह शतक पूर्ण केलं. स्मृतीचं हे टी 20i मधील पहिलंवहिलं शतक ठरलं. स्मृती तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला ठरली. त्यानंतर भारताने तिसरी विकेट गमावली. रिचा 12 रन्स करुन आऊट झाली.
जेमीमाह रॉड्रिग्स झिरोवर आऊट
जेमीमाह रॉड्रिग्सला भोपळाही फोडता आला नाही. जेमीमाहनंतर टीम इंडियाने स्मृतीच्या रुपात पाचवी विकेट गमावली. स्मृतीने 62 बॉलमध्ये 180.65 च्या स्ट्राईकने रेटने 112 रन्स केल्या. स्मृतीने या खेळीत 3 सिक्स आणि 15 फोर लगावले. तर अमनज्योत कौर आणि दीप्ती शर्मा ही जोडी नाबाद परतली. अमनज्योत कौरने 3 तर दीप्ती शर्माने 7 रन्स केल्या.
इंग्लंडसमोर 211 रन्सचं टार्गेट
Innings Break!
Captain Smriti Mandhana’s 112(62) helped #TeamIndia post a mammoth target 🎯
Over to our bowlers 🙌
Scorecard ▶️ https://t.co/iZwkYt8agO#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/ryBUJAAtJ6
— BCCI Women (@BCCIWomen) June 28, 2025
तर इंग्लंडकडून 6 जणांनी बॉलिंग केली. मात्र तिघींनी एकही विकेट मिळाली नाही. इंग्लंडसाठी लॉरेन बेल हीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
