AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WIND vs WNZ : टीम इंडियासमोर 233 धावांचं आव्हान, कोण जिंकणार मालिका?

Women India vs New Zealand 3rd Odi 1st Innings Highlights : न्यूझीलंडने टीम इंडियासमोर मालिका विजयासाठी 233 धावांचं आव्हान दिलं आहे. आता या सामन्यासह मालिकेवर कोण नाव कोरणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

WIND vs WNZ : टीम इंडियासमोर 233 धावांचं आव्हान, कोण जिंकणार मालिका?
womens team india vs new zealand 3rd odiImage Credit source: bcci women X Account
| Updated on: Oct 29, 2024 | 5:44 PM
Share

वूमन्स न्यूझीलंडने तिसर्‍या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 233 धावांचं आव्हान दिलं आहे. न्यूझीलंडने 49.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 232 धावा केल्या. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना या तिसऱ्या समन्यासह मालिका विजयाची दुहेरी संधी आहे. मात्र एकच कुणी विजेता ठरेल. त्यामुळे दोन्ही संघात आता मालिका विजयासाठी जोरदार चुरस आणि रस्सीखेंच पाहायला मिळणार आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. त्यानंतर आता फलंदाजांची पाळी आहे. आता भारतीय फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर कशी कामगिरी करतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

न्यूझीलंडची बॅटिंग

न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. मात्र भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला ठराविक अंतराने झटके देत 250 धावांच्या आत रोखण्यात यश मिळवलं. न्यूझीलंडसाठी ब्रूक हॅलिडे हीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. हॅलिडेने 96 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 9 फोरसह 86 रन्स केल्या. हॅलिडे व्यतिरिक्त एकीलाही भारतीय गोलंदाजांनी मोठी खेळी करण्याआधीच मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. जॉर्जिया प्लिमर हीने 67 चेंडूमध्ये 6 चौकारांसह 39 धावा जोडल्या. इसाबेला गझ हीने 25 धावा केल्या. तर ली ताहुहु हीने नाबाद 24 धावा जोडल्या. मॅडी ग्रीन हीने 15 रन्स केल्या. हॅना रोवेने 11 रन्स केल्या. या व्यतिरिक्त इतरांना स्वस्तात गुंडाळलं.

टीम इंडियाकडून एकूण 7 जणींनी बॉलिंग केली त्यापैकी चौघीच यशस्वी ठरल्या. दीप्ती शर्मा हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. प्रिया शर्मा हीने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर सायमा ठाकोर आणि रेणुका सिंह या दोघींनी 1-1 विकेट घेतली.

कोण जिंकणार मालिका?

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), जेमिमाह रॉड्रिग्स, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग, सायमा ठाकोर आणि प्रिया मिश्रा.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : सोफी डेव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, लॉरेन डाउन, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गझ (विकेटकीपर), हॅना रोवे, ली ताहुहू, ईडन कार्सन आणि फ्रॅन जोनास.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.