AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

THAI vs BAN : महिला आशिया कप स्पर्धेत बांग्लादेशचा थायलंडवर 7 विकेट्स राखून विजय, उपांत्य फेरीच्या आशा कायम

वुमन्स आशिया कप 2024 स्पर्धेत बांग्लादेश आणि थायलंड यांच्यात सामना रंगला. हा सामना बांग्लादेशने 7 गडी राखून जिंकला. या विजयासह बांग्लादेशचं उपांत्य फेरीच्या आशा कायम आहेत. ब गटातून श्रीलंकेने उपांत्य फेरीत दावा पक्का केला आहे. पण थायलंड आणि बांगलादेशचं गणित अडलं आहे.

THAI vs BAN : महिला आशिया कप स्पर्धेत बांग्लादेशचा थायलंडवर 7 विकेट्स राखून विजय, उपांत्य फेरीच्या आशा कायम
Image Credit source: Twitter
| Updated on: Jul 22, 2024 | 10:19 PM
Share

वुमन्स आशिया कप स्पर्धेत बांग्लादेशने थायलंडचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल थायलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय काही अंशी फसला असंच म्हणावं लागेल. कारण थायलंडला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. थायलंडने 20 षटकात 9 गडी गमवून 96 धावा केल्या आणि विजयासाठी 97 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान सोपं असलं तरी थायलंडच्या गोलंदाजांनी बऱ्यापैकी लढत दिली. बांगलादेशने हे आव्हान 3 गडी गमवून 17.3 षटकात पूर्ण केलं. त्यामुळे थायलंडला 15-20 धावा कमी पडल्या असंच म्हणावं लागेल. या पराभवासह थायलंडचं उपांत्य फेरीचं गणित फिस्कटलं आहे. तर बांग्लादेशच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ब गटातून श्रीलंकेचं उपांत्य फेरीचं जवळपास निश्चित आहे. तर दुसऱ्या संघासाठी थायलंड आणि बांग्लादेशपैकी एकाची वर्णी लागू शकते. आता पुढच्या सामन्यावर सर्व काही अवलंबून आहे.

श्रीलंकेने दोन पैकी दोन सामने जिंकून 4 गुणांसह +4.243 नेट रनरेट आहे. तर थायलंड दुसऱ्या स्थानावर असून 2 गुण आणि +0.098 नेट रनरेट आहे. बांग्लादेश तिसऱ्या स्थानावर असून 2 गुण आणि -0.024 नेट रनरेट आहे. बांग्लादेशपेक्षा थायलंडचा नेट रनरेट चांगला आहे.  त्यामुळे या दोन्ही संघांचं पुढच्या सामन्यावर भवितव्य अवलंबून आहे. बांग्लादेशचा सामना मलेशियाशी, तर श्रीलंकेचा सामना थायलंडशी आहे. बांग्लादेशसमोर सोपं, तर थायलंडसमोर कठीण आव्हान आहे. त्यामुळे आता 24 जुलैला होणाऱ्या सामन्यात काय होते? याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागून आहे. दुसरीकडे, अ गटातून भारताचं उपांत्य फेरीचं गणित सुटलं आहे. तर दुसऱ्या संघासाठी पाकिस्तान आणि नेपाळमध्ये चुरस आहे. त्यामुळे इथेही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

बांगलादेश महिला (प्लेइंग इलेव्हन): दिलारा अक्टर, मुर्शिदा खातून, इश्मा तंजीम, निगार सुलताना (विकेटकीपर/कर्णधार), रितू मोनी, राबेया खान, शोर्ना अक्टर, रुमाना अहमद, नाहिदा अक्टर, मारुफा अक्टर, सबिकुन नहर.

थायलंड महिला (प्लेइंग इलेव्हन): नट्टाया बूचाथम, नन्नापत कोन्चारोएनकाई (विकेटकीपर), फनिता माया, चनिडा सुथिरुआंग, सुवानन खियाओटो, थिपत्चा पुथावोंग (कर्णधार), ओन्निचा कामचोम्फू, रोसेनन कानोह, अपिसारा सुवान्चोन्राथी, सुलीपोर्न चतुर्थोन्ग, सुलेपोर्न चतुरांग.

मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी.
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती....
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात.
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?.
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर.
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?.
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य.