AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND : गुरुवार 5 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया-इंडिया वनडे सीरिज, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

Women Australia vs India 1st Odi Live Streming : वूमन्स ऑस्ट्रेलिया विरुद्ध वूमन्स इंडिया क्रिकेट संघात 5 डिसेंबरपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. जाणून घ्या पहिल्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार.

AUS vs IND : गुरुवार 5 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया-इंडिया वनडे सीरिज, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
Women Australia vs India odi series
| Updated on: Dec 04, 2024 | 8:11 PM
Share

मेन्स टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-2025 साठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. तर दुसरा सामना हा 6 डिसेंबरपासून अॅडलेड येथे होणार आहे. हा सामना डे-नाईट असून पिंक बॉलने खेळवण्यात येणार आहे. तर त्याआधी वूमन्स ऑस्ट्रेलिया विरुद्ध वूमन्स इंडिया यांच्यात एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. वूमन्स टीम इंडियाही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. उभसंघातील या मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहे. मालिकेतील पहिला सामना कुठे होणार? याबाबत आपण सर्वकाही जाणून घेऊयात.

वूमन्स ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया पहिला एकदिवसीय सामना केव्हा?

वूमन्स ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया पहिला सामना गुरुवारी 6 डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे.

वूमन्स ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया पहिला एकदिवसीय सामना कुठे?

वूमन्स ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया पहिला एकदिवसीय अॅलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन येथे होणार आहे.

वूमन्स ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया पहिला एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

वूमन्स ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया पहिला एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी सुरुवात होईल. तर त्याआधी 9 वाजून 20 मिनिटांनी टॉस होईल.

वूमन्स ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया पहिला एकदिवसीय सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?

वूमन्स ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया पहिला एकदिवसीय टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर सामन्याचा लाईव्ह थरार डिज्ने प्लस हॉटस्टार एपवरुन अनुभवता येणार आहे.

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 5 डिसेंबर, ब्रिस्बेन

दुसरा सामना, 8 डिसेंबर, ब्रिस्बेन

तिसरा सामना, 11 डिसेंबर, पर्थ

वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया वूमन्स टीम : ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), डार्सी ब्राउन, ऍशले गार्डनर, किम गर्थ, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, सोफी मोलिनक्स, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शूट, ॲनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम आणि जॉर्जिया वॉल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रिया पुनिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, राधा यादव, तितास साधू, उमा चेत्री (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकुर आणि सायमा ठाकोर.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.