IND vs PAK Toss: पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, टीम इंडिया विरुद्ध बॅटिंगचा निर्णय

Womens Asia Cup 2024 India vs Pakistan Toss: पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

IND vs PAK Toss: पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, टीम इंडिया विरुद्ध बॅटिंगचा निर्णय
wind vs wpak toss
Image Credit source: acc x account
| Updated on: Jul 19, 2024 | 7:11 PM

वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज आहे. या स्पर्धेतील दुसर्‍या सामन्यात टीम इंडिया कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील सलामीचा सामना आहे. या सामन्याचं आयोजन हे रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. निदा दार हीने बॅटिंगचा निर्णय करत टीम इंडियाला फिल्डिंगसाठी भाग पाडलंय.

आकडेवारी कुणाच्या बाजूने?

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 14 टी20i सामने खेळवण्यात आले आहेत. त्या 14 पैकी सर्वाधिक सामन्यांमध्ये वूमन्स इंडिया टीम वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने 14 पैकी 11 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानला फक्त 3 सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं आहे. तसेच उभयसंघात आशिया कप स्पर्धेत 2012 ते 2022 पर्यंत एकूण 6 सामने झाले आहेत. त्यापैकी 5 सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने 2022 मध्ये विजय मिळवला होता. टीम इंडियाच्या या 5 पैकी 4 सामने हे टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात जिंकले आहेत. तर 2012 साली टीम इंडियाने मिताली राजच्या कॅप्टन्सीत पाकिस्तानला लोळवलं होतं.

पाकिस्तानचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

टीम इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, दयालन हेमलता, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, श्रेयंका पाटील आणि रेणुका ठाकूर सिंग.

पाकिस्तान वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: निदा दार (कॅप्टन), सिद्रा अमीन, गुल फिरोजा, मुनीबा अली (डब्ल्यू), आलिया रियाझ, इरम जावेद, फातिमा सना, तुबा हसन, सादिया इक्बाल, नशरा संधू आणि सय्यदा आरूब शाह.