SL vs BAN: श्रीलंकेची विजयी सलामी, बांगलादेशवर 7 विकेट्सने मात
Sri Lanka Women vs Bangladesh Women: यजमान श्रीलंका संघाने आशिया कप स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. श्रीलंकेने बांगलादेशवर एकतर्फी विजय मिळवला आहे.

आशिया कप 2024 स्पर्धेतील चौथा सामना जिंकून वूमन्स श्रीलंका क्रिकेट टीमने विजयी सलामी दिली आहे. बी ग्रुपमधील श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील या सामन्याचं आयोजन हे रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे करण्यात आलं होतं. बांगलादेशने श्रीलंकेला विजयासाठी 112 धावांचं आव्हान दिलं होतं. यजमान श्रीलंकेने हे आव्हान 17 बॉल राखून आणि 3 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. विश्मी गुणरत्ने ही श्रीलंकेच्या विजयाची नायिका ठरली. विश्मीने श्रीलंकेकडून सर्वाधिक 51 धावांची खेळी केली. तर बांगलादेशकडून नाहिदा अक्तर हीने तिन्ही विकेट्स घेतल्या.
विश्मीने 48 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 सिक्ससह 51 धावा केल्या. हर्षिता समरविक्रमाने 31 बॉलमध्ये 4 चौकारांसह 33 धावा केल्या. कॅप्टन चमारी अठापठ्ठू आणि कविशा दिलहकी या दोघींनी प्रत्येकी 12 धावा केल्या. तर हसीनी परेरा 1 धावेवर नाबाद परतली. तर बांगलादेशकडून नाहिदा व्यतिरिक्त इतर कुणालाही विकेट घेण्यात यश आलं नाही.
बांगलादेशची बॅटिंग
दरम्यान त्याआधी बांगलादेशने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा निर्णय फलंदाजांनी चुकीचा ठरवला. श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर बांगलादेशने गुडघे टेकले. बांगलादेशकडून तिघींनी दुहेरी आकडा गाठला. तिघी आल्या तशाच गेल्या. तर तिघींचं दुहेरी आकड्याआधीच पॅकअप झालं. कॅप्टन निगर सुल्ताना हीने सर्वाधिक 48 धावा केल्या. सोरना अक्तरने 25 आणि रबिया खानने 10 धावा केल्या. तर नहिदा अक्तर 4 धावांवर नाबाद राहिली. श्रीलंकेकडून प्रबोधिनी आणि प्रियदर्शनी या दोघींनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर सुगंदिका कुमारी, कविशा दिलहारी आणि कॅप्टन चमिरा अथापठ्ठू या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
श्रीलंकेची विजयी सुरुवात
What a way to kick off the #WomensAsiaCup2024! 💪🇱🇰 A fantastic 7-wicket victory over Bangladesh! #WomensAsiaCup2024 #SLvBAN #GoLionesses pic.twitter.com/W8cIqRi63n
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 20, 2024
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : चमारी अठापठ्ठू (कॅप्टन), विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, हसिनी परेरा, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), कविशा दिलहारी, सुगंधिका कुमारी, उदेशिका प्रबोधनी, अचिनी कुलसुरिया आणि इनोशी कुलसुरिया.
बांग्लादेश प्लेइंग ईलेव्हन: निगार सुलताना (कॅप्टन आणि विकेटकीपर), दिलारा अक्तर, इश्मा तंजीम, रुबिया हैदर, रितू मोनी, शोर्ना अक्टर, राबेया खान, शोरिफा खातून, नाहिदा अक्तर, मारुफा अक्तर आणि सुलताना खातून.
