AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens Asia Cup T20 : पाकिस्तानचं उपांत्य फेरीचं गणित टीम इंडियावर अवलंबून, जर असं झालं तर बाहेरचा रस्ता

वुमन्स आशिया कप टी20 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. उपांत्य फेरीचं गणित आता जर तर वर अवलंबून आहे. खासकरून पाकिस्तानचं पुढचं गणित भारतीय संघाच्या कामगिरीवर अवलंबून आहे. इतकंच काय तर शेवटच्या सामन्यात पाकिस्तानकडून काही गडबड झाली तर थेट बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे.

Womens Asia Cup T20 : पाकिस्तानचं उपांत्य फेरीचं गणित टीम इंडियावर अवलंबून, जर असं झालं तर बाहेरचा रस्ता
Image Credit source: Twitter
| Updated on: Jul 22, 2024 | 3:10 PM
Share

वुमन्स आशिया कप टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीचा अंतिम टप्पा सुरु आहे. त्यामुळे उपांत्य फेरीचं गणित रंगतदार वळणावर येऊन ठेपलं आहे. भारत, पाकिस्तान,नेपाळ आणि यूएई हे संघ अ गटात आहेत. या गटात भारतीय संघाने दोन पैकी दोन सामने जिंकून उपांत्य फेरीत दावा पक्का केला आहे. भारताचं नेट रनरेट चांगला असल्याने शेवटच्या सामन्यात काही गडबड जरी झाली तरी काही फरक पडणार नाही. त्यामुळे दुसऱ्या उपांत्य फेरीच्या संघासाठी जर तरचं गणित आहे. दुसरीकडे, यूएईचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या संघासाठी पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात चुरस आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यात या दोन्ही संघांचा कस लागणार आहे. पाकिस्तान विरुद्ध यूएई आणि भारत विरुद्ध नेपाळ असा सामना आहे. शेवटच्या सामन्यात यूएईने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली तर पुढचं गणित कठीण होईल. दुसरीकडे, पाकिस्तानने यूएईविरुद्धचा सामना जिंकला की प्रश्न काही अंशी सुटेल. पण उपांत्य फेरीसाठी भारत आणि नेपाळ या सामन्याकडे लक्ष ठेवावं लागेल. चुकून नेपाळने भारताला पराभूत केलं तर मात्र पाकिस्तानचं काही खरं नाही. त्यामुळे जर तरच्या गणित पाकिस्तानचं पुढचं गणित बिघडू शकतं.

भारताने दोन पैकी दोन सामने जिंकत 4 गुण आणि +3.386 नेट रनरेटसह पहिलं स्थान पटकावलं आहे. तर पाकिस्तानने एक सामना गमवून आणि एक जिंकून 2 गुण आणि +0.409 नेट रनरेटसह दुसरं स्थान पटकावलं आहे. नेपाळने दोन पैकी एक सामना जिंकून आणि एक गमवल्याने 2 गुण आणि -0.819 नेट रनरेटसह तिसरं स्थान पटकावलं आहे. तर यूएईने दोन पैकी दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे शून्य गुणांसह -2.870 नेट रनरेट आहे.

चारही संघांचे खेळाडू

भारतीय महिला संघ: शफाली वर्मा, स्मृती मंधना, दयालन हेमलता, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कंवर, रेणुका ठाकूर सिंग, उमा चेत्री, एस सजना, अरुंधती रेड्डी, आशा शोभना

संयुक्त अरब अमिराती महिला संघ: ईशा रोहित ओझा (कर्णधार), तीर्था सतीश (विकेटकीपर), रिनिता राजित, समायरा धरणीधारका, कविशा इगोडागे, खुशी शर्मा, हीना होचंदानी, वैष्णवे महेश, रितीका राजित, लावण्य केनी, इंधुजा नंदकुमार, मेहमी ठाकूर, ईमिली थॉमस, ऋषिथा राजित, सुरक्षा कोट्टे

पाकिस्तान महिला संघ: गुल फिरोजा, मुनीबा अली (विकेटकीपर), सिद्रा अमीन, आलिया रियाझ, निदा दार (कर्णधार), तुबा हसन, इरम जावेद, फातिमा सना, सय्यदा आरूब शाह, नशरा संधू, सादिया इक्बाल, डायना बेग, ओमामा सोहेल, नजीहा अल्वी, तस्मिया रुबाब.

नेपाळ महिला संघ : समझ खडका, सीता राणा मगर, कविता कुंवर, इंदू बर्मा (कर्णधार), रुबिना छेत्री, पूजा महतो, बिंदू रावल, काजल श्रेष्ठ (विकेटकीपर), कविता जोशी, कृतिका मरासिनी, सबनम राय, डॉली भट्टा, रोमा थापा, ममता चौधरी, राजमती आयरी

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.