
मुंबई : आयसीसी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी 23 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमी फायनल रंगणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 6 वाजता टॉस होणार आहे. या निर्णायक सामन्यात टॉसची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. या सामन्याचं आयोजन हे केपटाऊनमधील न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाचं अंतिम फेरीत पोहण्याचा आणि ऑस्ट्रेलियाचा मागील पराभवाचा वचपा घेण्याचा प्रयत्न असणार आहे.
टीम इंडियाने वर्ल्ड कप मोहिमेतील प्रवास हा पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने झाला. टीम इंडियाने या पहिल्याच सामन्यात कट्टर स्पर्धक असलेल्या पाकिस्तानला पराभूत करत विजयी सुरुवात केली. त्यामुळे टीम इंडियाचा विश्वास दुणावला. टीम इंडियाने त्यानंतर विंडिजचा पराभव केला. टीम इंडियाचा अशाप्रकारे सलग दुसरा विजय ठरला. त्यानंतर तिसरा सामना होता तो इंग्लंड विरुद्ध. या सामन्यात इंग्लंडने भारताच्या विजयाला फूलस्टॉप लावला. भारताला या वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला.
आता साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना होता तो आयर्लंड विरुद्ध. हा सामना टीम इंडियासाठी सेमी फायनलच्या दृष्टीने महत्वाचा होता. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचं या सामन्याकडे लक्ष होतं. टीम इंडियाने या महत्वाच्या सामन्यात विजय मिळवत सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म केलं.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | हरमनप्रीत कौर (कर्णधार), हार्लीन देओल, जेमिह रॉड्रिग्स, सब्बिनेनी मेघना, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, अंजली सरवानी, मेघना सिंग, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग आणि शिखा पांडे.
टीम ऑस्ट्रेलिया | बेथ मूने, ग्रेस हॅरिस, मेग लॅनिंग (कर्णधार), अॅनाबेल सुथरलँड, अशले गार्डनर, इलिस पेरी, हिथर ग्रॅहम, जेस जोनस्सेन, किम गार्थ, तहिला मॅग्राथ, अलिसा हीली, अलाना किंग, डार्सी ब्राउन, जॉर्जिया वारेहम आणि मेगन स्कूट.