AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Aus Women : ऑस्ट्रेलियाला रोखण्यासाठी इतक्या धावा बास्सं! उपांत्य फेरीपूर्वी रिचा घोषनं सांगितली रणनिती

वर्ल्डकप 2022 च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 4-1 ने पराभव केला होता. असं असलं तरी भारतीय रणरागिणींनी ऑस्ट्रेलियाला सहज हरवण्यासाठी कंबर कसली आहे.

Ind vs Aus Women : ऑस्ट्रेलियाला रोखण्यासाठी इतक्या धावा बास्सं! उपांत्य फेरीपूर्वी रिचा घोषनं सांगितली रणनिती
T20 WC : उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा विजयरथ असा रोखणार, रिचा घोषनं सांगितली स्ट्रॅटर्जीImage Credit source: Twitter
| Updated on: Feb 22, 2023 | 10:13 PM
Share

मुंबई : आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. या सामन्यात तसं पाहिलं तर ऑस्ट्रेलियाचं पारडं जड आहे.वर्ल्डकप 2022 च्या अंतिम फेरीतही ऑस्ट्रेलियाने भारताला पराभवाचं पाणी पाजलं होतं. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 4-1 ने पराभव केला होता. पण भारताची वर्ल्डकपमधील कामगिरी पाहता ऑस्ट्रेलियाला सहज हरवण्यासाठी कंबर कसली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघानं विजयाची खात्री दिली आहे. विकेटकीपर बॅटर रिचा घोषणं हायव्होल्टेज सामन्यापूर्वी संघाची रणनिती काय असेल याबाबत स्पष्ट सांगितलं आहे. 180 धावांचं टार्गेट ऑस्ट्रेलियाला पुरेसं असल्याचं मत तिने व्यक्त केलं आहे.

“ऑस्ट्रेलियन संघ रन्स चेस करण्यात पटाईत आहे. कारण त्यांच्याकडे तळापर्यंतचे खेळाडू चांगली फलंदाजी करतात. आम्हीही चांगल्या प्रकारे चेस करू शकतो. पण नाणेफेक कुणाच्याही हातात नाही. त्यामुळे जे काही स्थिती आहे ती आम्ही चांगल्या प्रकारे हाताळू यात शंका नाही. यासाठी आम्ही खास प्लान तयार केला आहे.”, असं रिचा घोषनं पत्रकार परिषदेत सांगितलं.

“खेळपट्टी कशी हे मला माहिती नाही पण आम्ही तयार आहोत. आम्ही त्यांना 180 धावांचं टार्गेट देण्यासाठी प्रयत्न करू. गोलंदाजीत आम्ही त्यांना 140-150 धावांवर रोखू. कारण त्यांच्याकडे चांगला बॅटिंग लाइनअप आहे.”, अशी रणनिती रिचा घोष हिनं सांगितलं.

काय झालं होतं टी 20 वर्ल्डकप 2020 स्पर्धेत

टी 20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 4 गडी गमवून 184 धावा केल्या आणि विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना भारतीय महिला संघ 99 या धावसंख्येवर बाद झाला. त्यामुळे जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं.

दोन्ही संघाचे खेळाडू

भारतीय संघ- हार्लीन देओल, जेमिह रॉड्रिग्स, सब्बिनेनी मेघना, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, अंजली सरवानी, मेघना सिंग, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, शिखा पांडे

ऑस्ट्रेलियन संघ- बेथ मूने, ग्रेस हॅरिस, मेग लॅनिंग (कर्णधार), अॅनाबेल सुथरलँड, अशले गार्डनर, इलिस पेरी, हिथर ग्रॅहम, जेस जोनस्सेन, किम गार्थ, तहिला मॅग्राथ, अलिसा हीली, अलाना किंग, डार्सी ब्राउन, जॉर्जिया वारेहम, मेगन स्कूट

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.