Women’s T20 World Cup 2026 उपांत्य फेरीत इंग्लंड, दुसऱ्या स्थानासाठी तीन संघ शर्यतीत

England vs West Indies: वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 22व्या सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजचा 38 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह इंग्लंडने उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे. पण या स्पर्धेत क्षेत्ररक्षणात इंग्लंडने सर्वात वाईट कामगिरी केली आहे.

Women’s T20 World Cup 2026 उपांत्य फेरीत इंग्लंड, दुसऱ्या स्थानासाठी तीन संघ शर्यतीत
Women’s T20 World Cup 2026 उपांत्य फेरीचा पहिला संघ ठरला, दुसऱ्या स्थानासाठी तीन संघ शर्यतीत
Image Credit source: England Cricket Twitter
| Updated on: Jun 25, 2026 | 7:24 PM

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीची चुरस वाढली आहे. असं असताना या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीत स्थान मिळवलेला संघ ठरला आहे. इंग्लंडने या स्पर्धेतील 22 व्या सामन्यात वेस्ट इंडिजला 38 धावांनी मात दिली. यासह सलग चार विजय मिळवून इंग्लंडने उपांत्य फेरी गाठली आहे. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात खेळल्या गेलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 186 धावा केल्या. तसेच विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही वेस्ट इंडिजला गाठता आलं नाही. वेस्ट इंडिजने 20 षटकात 5 गडी गमवून 148 धावा केल्या. या विजयामुळे इंग्लंडचं उपांत्य फेरीचं गणित सुटलं पण वेस्ट इंडिजचं गणित मात्र किचकट झालं आहे.

ब गटातील उपांत्य फेरीच्या एका जागेसाठी तीन संघ

आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या ब गटात एकूण सहा संघ आहेत. इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, श्रीलंका, स्कॉटलँड आणि आयर्लंड हे संघ आहेत. या गटातून दोन संघांची उपांत्य फेरीत वर्णी लागणार आहे. यापैकी इंग्लंडने उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं आहे. तर स्कॉटलँड आणि आयर्लंडचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात एका जागेसाठी लढत असणार आहे. यात वेस्ट इंडिज संघाला सर्वाधिक संधी आहे.

वेस्ट इंडिजचा या गटातील शेवटचा सामना 27 जूनला आयर्लंडशी होणार आहे. हा सामना जिंकताच उपांत्य फेरीत जागा मिळेल. पण आयर्लंडविरुद्धचा सामना गमावला तर गणित नेट रनरेटवर येईल. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांनी उर्वरित सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवला तर ते वेस्ट इंडिजला मागे टाकू शकतात. हा सामना पावसामुळे रद्द झाला तर वेस्ट इंडिज आयर्लंडला प्रत्येकी एक गुण मिळेल. त्यामुळे वेस्ट इंडिजला उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. दुसरीकडे, न्यूझीलंड आणि श्रीलंकेचा शेवटचा सामना शिल्लक आहे. त्यांनी या सामन्यात विजय मिळवला तर सहा गुणच होतील. अशा स्थितीत वेस्ट इंडिजने शेवटचा सामना गमावला तर आणि तरच नेट रनरेटचं गणित लागून होईल.

Follow Us