AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत उडाली खळबळ, बॅटला बॉल लागला नाही तरी दिलं आऊट

Women's T20 World Cup 2026: आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत खळबळ उडाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूजल टीव्ही पंचांनी बाद दिलं. पण रिप्लेत तिची बॅट बॉलपासून खूपच दूर होता.

Video: वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत उडाली खळबळ, बॅटला बॉल लागला नाही तरी दिलं आऊट
Video: वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत उडाली खळबळ, बॅटला बॉल लागला नाही तरी दिलं आऊटImage Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jun 25, 2026 | 4:17 PM
Share

Hayley Matthews Wicket Controversy: आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात पंचांच्या निर्णयामुळे वादाला फोडणी मिळाली आहे. लॉर्ड्स मैदानावर खेळला गेलेल्या मैदानात वेस्ट इंडिजची कर्णधार आणि स्टार अष्टपैलू हेली मॅथ्यूजला पंचांच्या निर्णयामुळे धक्का बसला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या षटकात सदर प्रकार घडला. इंग्लंडची गोलंदाज लिन्से स्मिथच्या गोलंदाजीवर हेली मॅथ्यूजने कट शॉट करण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू थेट विकेटकीपर एमी जोन्सच्या हातात गेला. त्यानंतर एमपी जोन्सने जोरदार अपील केली. त्यांनी मैदानी पंच एन जनानी यांनी नाबाद दिलं. त्यानंतर इंग्लंडची कर्णधार चार्ली डीने रिव्ह्यू घेतला. पण तिसऱ्या पंचांनी बाद दिले. बॅट आणि बॉलमध्ये गॅप दिसत असूनही पंचांनी बाद दिला. त्यामुळे तिने मैदानात नाराजी व्यक्त केली.

या सामन्यातील विकेटच्या व्हिडीओच्या सुरूवातीला चेंडू बॅटच्या जवळून गेल्याचं दिसला. पण स्पष्ट डिफ्लेक्शन दिसलं नाही. त्यानंतर टीव्ही पंच निमाली परेरा यांनी अल्ट्रा एज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तपासण्याचा निर्णय घेतला. त्यात एक स्पाइक दिसली. म्हणजेच तेव्हा बॉल बॅटच्या संपर्कात असल्याचं दाखवत होती. पण त्याचवेळी फ्रेम तपासली तेव्हा बॉल बॅटपेक्षा लांब होता. पंच परेरा यांनी हा गॅप असल्याचं मान्य केलं आणि पुन्हा तपासलं. पण शेवटी मैदानी पंचांना आपला निर्णय बदलून आऊट देण्याचा आदेश दिला. त्यामुळे प्रत्येक जण आश्चर्यचकीत झालं. पंचांच्या या निर्णयामुळे हेली मॅथ्यूज प्रचंड नाराज दिसली. तसेच या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केलं.

हेली मॅथ्यूज हिने मैदान सोडण्यापूर्वी पंच जननी आणि एलोइस शेरिडन यांच्याशी वाद घातला. इतकंच काय मैदान सोडल्यानंतरही तिचा राग कायम होता. डगआऊटमध्ये तिने मुख्य प्रशिक्षक शेन डाउट्स यांच्यासोबतही बाद होण्याचा रिप्ले पाहिला. त्यानंतर तिने राखीव पंच कॅरिन क्लॉस्टे यांच्याशी बरीच चर्चा केली.

इंग्लंडने या सामन्यात 20 षटकात 7 गडी गमवून 186 धावा केल्या. तसेच विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना 20 षटकात 5 गडी गमवून 148 धावा केल्या. हा सामना वेस्ट इंडिजने 38 धावांनी गमावला. या विजयासह इंग्लंडचा संघ उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा