AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WT20 WC 2026: एक पराभव आणि टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं गणित झालं किचकट, आता करो या मरो!

आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी आता जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. असं असताना टीम इंडियाचं गणित एक पराभवामुळे किचकट झालं आहे.

WT20 WC 2026: एक पराभव आणि टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं गणित झालं किचकट, आता करो या मरो!
WT20 WC 2026: एक पराभव आणि टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं गणित झालं किचकट, आता करो या मरो!Image Credit source: BCCI
| Updated on: Jun 23, 2026 | 7:33 PM
Share

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अ गटात उपांत्य फेरीसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, बांग्लादेश, पाकिस्तान आणि नेदरलँड हे संघ आहेत. यापैकी पाकिस्तान नेदरलँड संघ स्पर्धेतील तीन सामने खेळल्यानंतर आऊट झाले आहे. या दोन्ही संघांनी तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे या दोन संघांना उर्वरित दोन सामने औपचारिक असणार आहेत. मात्र एखाद्या संघाचं चित्र पालटू शकतात. या गटात ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत खेळलेल्या तीन पैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच उपांत्य फेरीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. दुसरीकडे, दुसऱ्या जागेसाठी भारत, दक्षिण अफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. भारताने या स्पर्धेत खेळलेल्या तीन पैकी दोन सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे उपांत्य फेरीचं गणित आता जर तर वर आलं आहे.

भारताने साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि दुसऱ्या सामन्यात नेदरलँडला पराभूत केलं. पण तिसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे भारताचं उपांत्य फेरीचं गणित आता जर तर वर आलं आहे. भारताला उपांत्य फेरी गाठायचं असेल तर उर्वरित दोन्ही सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागेल. इतकंच काय तर दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेशच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. भारताचा पुढचे दोन सामने बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहेत. भारताने हे दोन्ही सामने जिंकले तर उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. पण एक सामना गमावला तर कठीण आहे.

दोन्ही सामन्यात विजय आणि उपांत्य फेरीचं तिकीट

भारताचा 25 जून रोजी सामना बांगलादेशविरुद्ध, तर दुसरा सामना 28 जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. या दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. कारण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेचे 8 गुण असले तरी भारताचा नेट रनरेट चांगला आहे. त्यामुळे या गटात अव्वल दोन मध्ये स्थान आरामात मिळेल.

दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेशच्या कामगिरीवर लक्ष

भारत, दक्षिण अफ्रिका आणि बांग्लादेश यांचे प्रत्येकी 4 गुण आहेत. पण नेट रनरेटच्या बाबतीत भारत पुढे असल्याने दुसऱ्या स्थानी आहे. भारताला पुढच्या फेरीत पात्र ठरण्यासाठी दक्षिण अफ्रिकेने नेदरलँड किंवा बांगलादेशविरुद्धचा एक सामना गमवणं फायदेशीर ठरेल. अफ्रिकेने दोन्ही सामने जिंकले तर नेट रनरेटवर गणित असणार आहे. सध्या भारताचा नेट रनरेट हा +2.511 आहे. तर दक्षिण अफ्रिकेचा नेट रनरेट हा -0.546 आहे. त्यामुळे भारताला अशा स्थितीत संधी मिळेल.

एका सामन्यात पराभव झाला तर…

भारताला उर्वरित दोन पैकी एका सामन्यात पराभव झाला तर सर्व गणित जर तर वर येईल. कारण भारताच्या पारड्यात 6 गुण होतील. अशा स्थितीत दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेशच्या इतर सामन्यांच्या निकालावर लक्ष ठेवावं लागेल.  तसेच नेट रनरेटही महत्त्वाची भूमिका बजावेल.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला