AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण तर रोहित शर्मा, आर्मिडा फर्नांडिस, भिकल्या लाडक्या धिंडा आदींना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री प्रदान

देशातील महत्वाचे नागरी सन्मान असलेल्या ‘पद्म पुरस्कारांचे’ वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानपूर्वक करण्यात आले. महाराष्ट्रातील सात मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले.

गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण तर रोहित शर्मा, आर्मिडा फर्नांडिस, भिकल्या लाडक्या धिंडा आदींना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री प्रदान
ROHIT SHARMA
| Updated on: Jun 23, 2026 | 8:35 PM
Share

नवी दिल्ली येथे आज ‘पद्म’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. देशातील महत्वाचा नागरी सन्मान असलेल्या पद्म पुरस्काराचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानपूर्वक करण्यात आले. महाराष्ट्रातील सात मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले. यात कला क्षेत्रासाठी गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण आणि रोहित शर्मा,आर्मिडा फर्नांडिस, भिकल्या लाडक्या धिंडा, माधवन रंगनाथन, सतीश शाह ( मरणोत्तर ) तसेच अशोक खाडे आदींना पद्मश्री प्रदान करण्यात आला.

राष्ट्रपती भवनातील  ‘गणतंत्र मंडप’ येथे आयोजित या समारंभास उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन , पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांसह अन्य केंद्रीय मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.

पद्म पुरस्कार वितरणाच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातील 65 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.यामध्ये 2 पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील मान्यवरांपैकी प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल  ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. 16 हून अधिक भाषांमध्ये 2 हजारांपेक्षा अधिक गीते गाऊन त्यांनी भारतीय संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.

सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘हिटमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्मा यांनी भारतीय क्रिकेटला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत.

डॉ. आर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री प्रदान

वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. आर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री प्रदान करण्यात आला. भारतातील नवजात शिशुवैद्यकशास्त्राच्या अग्रणी तज्ज्ञांपैकी एक असलेल्या डॉ. फर्नांडिस यांनी 1989 मध्ये मुंबईतील सायन रुग्णालयात आशियातील पहिली मानवी दूध बँक सुरू केली. अकाली आणि दुर्बल नवजात बालकांचे प्राण वाचविण्यात त्यांच्या कार्याचा मोठा वाटा आहे.

वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 वर्षीय तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. बांबू आणि सुक्या भोपळ्यापासून तयार होणारे सुमारे 10 फूट लांबीचे तारपा वाद्य वाजविण्याच्या त्यांच्या कौशल्याला राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले.

आर. माधवन कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री

अभिनेते, पटकथालेखक, निर्माते आणि दिग्दर्शक आर. माधवन यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘अलैपायुथे’, ‘रहना है तेरे दिल में’, ‘थ्री इडियट्स’, ‘तनू वेड्स मनू’, ‘विक्रम वेधा’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली आहे. ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली.

सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री

ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये चार दशकांहून अधिक काळ त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्यावतीने हा पुरस्कार त्यांचे बंधू अरविंद मामनिया यांनी स्वीकारला.

उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. माझगाव डॉकमध्ये नोकरी करत असताना अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून त्यांनी 1992 मध्ये भावांसह ‘दास ऑफशोअर’ कंपनीची स्थापना केली. आज ही कंपनी देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते.

यंदाच्या पद्म पुरस्कारांसाठी एकूण 131 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कारार्थींमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 मान्यवरांना मरणोत्तर सन्मान जाहीर करण्यात आला आहे

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?