World Cup 2023 आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, भारतासाठी डोकेदुखी ठरणारा मॅचविनर खेळाडू बाहेर!

ऑस्ट्रेलिया संघाला याचा फटका बसला आहे. टीममधील मॅचविनर खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्ड कपच्या बाहेर झाला आहे. ऑस्ट्रेलिया संघासाठी भारतीय मैदानांवर हा खेळाडू चमकदार कामगिरी करत होता.

World Cup 2023 आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, भारतासाठी डोकेदुखी ठरणारा मॅचविनर खेळाडू बाहेर!
| Updated on: Sep 28, 2023 | 3:52 PM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 चा थरार सुरू व्हायला काही दिवस बाकी आहेत. या स्पर्धेला सुरूवात होण्याआधी प्रत्येक संघातील अनेक खेळाडूंच्या मागे ग्रहण लागलेलं होतं. यामधील मोजके खेळाडू आता फिट होऊन संघात परतले आहेत. मात्र काही खेळाडूंच्या मागे अजुनही दुखापतीची पीडा लागली आहे. अशातच ऑस्ट्रेलिया संघाला याचा फटका बसला आहे. टीममधील मॅचविनर खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्ड कपच्या बाहेर झाला आहे. ऑस्ट्रेलिया संघासाठी भारतीय मैदानांवर हा खेळाडू चमकदार कामगिरी करत होता.

कोण आहे तो खेळाडू?

कांगारूंचा हा मॅचविनर खेळाडू दुसरा तिसरा कोणी नाहीतर अॅश्टन अगर आहे. अॅश्टन अगरला याआधी दुखापत झाली होती मात्र वर्ल्ड कपपर्यंत तो फिट होईल असं सर्वांना वाटलं होतं. मात्र दुखापतीमधून तो अजुनही काही सावरला नाही. शेवटी अॅश्टन अगर हा संपूर्ण टूर्नामेंटमधून बाहेर झाला आहे. आयसीसीच्या सर्व ट्रॉफी जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला संघासाठी हा मोठा धक्का आहे

आधीच भारताविरूद्ध झालेली तीन वन डे सामन्यांची मालिका कांगारूंनी गमावली. शेवटच्या सामन्यामधील विजय सोडला कर सलग दोन सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कपमधील पहिला सामनाही भारतासोबत होणार आहे.  भारतासोबत 8 ऑक्टोबरल हा सामना पार पडला जाणार असून यंदा भारतीय संघाने जोरदार तयारी केली आहे. याआधी कांगारू संघाला 2 सराव सामने खेळण्याचीही संधी मिळणार आहे. यामध्ये ३० सप्टेंबरला नेदरलँड संघाविरुद्ध एक सामना खेळायचा आहे तर दुसरा सामना ३ ऑक्टोबरला पाकिस्तान संघाविरुद्ध खेळायचा आहे.

ऑस्ट्रेलिया विश्वचषक संघ  2023 : पॅट कमिन्स (C), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, अॅश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.