IND vs BAN : विराट कोहलीबाबत असं काय बोलून गेला शाकिब अल हसन, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सलग तीन विजयानंतर टीम इंडियासमोर बांगलादेशचं आव्हान आहे. बांगलादेशनं अनेकदा टीम इंडियाला आरसा दाखवला आहे. त्यामुळे गाफिल राहून चालणार नाही. त्यात शाकिब अल हसन याने विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

IND vs BAN : विराट कोहलीबाबत असं काय बोलून गेला शाकिब अल हसन, सोशल मीडियावर चर्चांना उधाण
IND vs BAN : विराट कोहलीची स्तुती कि फिरकी! शाकिब अल हसनच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर रंगली चर्चा
| Updated on: Oct 18, 2023 | 7:09 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत टीम इंडियाचा सामना बांगलादेशची होणार आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांचा या स्पर्धेतील चौथा सामना आहे. भारताला उपांत्य फेरीची वाट सोपी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यात विजय मिळाल्यास 2 गुणांची भर आणि नेट रनरेटमध्येही फायदा होऊ शकतो. पण असं असलं तरी भारताला वाटतो तितका सोपा विजय नसेल. त्यामुळे मागचा इतिहास पाहता ताकही फुंकून पिणं गरजेचं आहे. दुसरीकडे, बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन यानेही विराट कोहली अप्रत्यक्षरित्या डिवचलं आहे. स्तुती करता करता बरंच काही बोलून गेला आहे. त्यामुळे स्तुती केली की फिरकी घेतली असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. सामन्यापूर्वी बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने एकप्रकारे आव्हानच दिलं आहे, असं सांगितलं जात आहे.

काय म्हणाला शाकिब अल हसन?

स्टार स्पोर्टवर बोलताना शाकिब अल हसन याने सांगितलं की, ‘विराट कोहली या युगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे आणि मी याबाबतीच नशिबवान आहे की, त्याला पाच वेळा आऊट केलं आहे. त्याला बाद केल्यानंतर मला नक्कीच आनंद मिळेल.’ शाकिब अल हसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फॉर्मेटमध्ये विराट कोहलीला बाद केलं आहे. वनडे क्रिकेटमधील 14 डावात शाकिबने पाचवेळा बाद केलं आहे.

विराट कोहलीने केली प्रशंसा

विराट कोहलीने सांगितलं की, “शाकिब जवळ जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांना अडचणीत आणण्याचे गुण आहेत. मी त्याच्या विरोधात बरंच क्रिकेट खेळलो आहे. त्याचं नियंत्रण एकदम भारी आहे. तसेच अनुभवी गोलंदाज आहे. शाकिब नव्या चेंडूसोबत चांगली गोलंदाजी करतो. त्यामुळे फलंदाज अडचणीत येतात. त्यामुळे त्याची गोलंदाजी खेळणं खरंच आव्हानात्मक असेल.”

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव/ श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.