AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup आधी सर्व संघांसाठी धोक्याची घंटा, गोलंदाजांचा कर्दनकाळ असलेल्या खेळाडूचं कमबॅक!

World Cup 2023 : एका संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शांंत स्वभाव, कोणताही उतावळेणा नाही, शांत डेक्याने सगळी गणिते करणार कर्णधार परतलाय. त्यामुळे इतर संघांसाठी धोक्याचीच घंटा म्हणावी लागेल. 

World Cup आधी सर्व संघांसाठी धोक्याची घंटा, गोलंदाजांचा कर्दनकाळ असलेल्या खेळाडूचं कमबॅक!
वर्ल्ड कपमध्ये सर्व संघांनी आपल्या 15 तगड्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये झकास कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड झाली आहे.
| Updated on: Sep 05, 2023 | 11:57 AM
Share

मुंबई : आयसीसीने वर्ल्ड कप 2023 ला काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. आयसीसीकडून सर्व देशांना आपले वर्ल्ड कपसाठीचे संघ जाहीर करण्याची आज (5 सप्टेंबर) अंतिम तारीख आहे. (Kane Williamson Fitness Update) सर्व संघाना 5 सप्टेंबरला आपला संघ जाहीर करायचा आहे. त्यानंतर 28 सप्टेंबरपर्यंत काही बदल करायचा असेल तर तुम्ही करू शकता. अशातच एका संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शांंत स्वभाव, कोणताही उतावळेणा नाही, शांत डेक्याने सगळी गणिते करणार कर्णधार परतलाय. त्यामुळे इतर संघांसाठी धोक्याचीच घंटा म्हणावी लागेल.

कोण आहे तो खेळाडू?

वर्ल्ड कप 2023 तोंडावर आला सर्व देशांच्या टीमने संघ बांधणीला सुरूवात केली आहे. यंदाचा वन डे वर्ल्ड कप भारतात असल्याने टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. त्यामुळे सर्व संघांनी आपल्या मुख्य खेळाडूंना रेडी ठेवलं आहे. वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धेसाठी मोठे खेळाडू नेहमी संघासाठी फायद्याचे ठरतात. अशातच सर्व गोलंदाजांचा काळ असल्याप्रमाणे आपल्या फलंदाजीच्या जोरावर सामने पालटवले आहेत.

वन डे क्रिकेटमध्ये गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणारा हा फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसन आहे. केन हा असा फलंदाज आहे जो कोणत्याही परिस्थितीमध्ये संघासाठी महत्त्वाची खेळी करू शकतो. केनच्या नेतृत्त्वाखाली 2019 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड संघाने फायनलपर्यंत धडक मारलेली. मात्र इंग्लंडकडून त्यांच्या फायनल सामन्यामध्ये पराभव झाला होता. त्यानंतर पहिला कसोटी वर्ल्ड कपसुद्धा न्यूझीलंड संघाने केनच्या नेतृत्त्वाखालीच जिंकला होता.

दरम्यान, आयपीएलच्या 2022 च्या हंगामामध्ये केनला फिल्डिंग करताना दुखापत झाली होती.  ही दुखापत केनला चांगलीच महागात पडली. मार्च महिन्यापासून केन क्रिकेटपासूव दूर आहे. त्यामुळे त्याला वर्ल्ड कपसाठी खेळायचं असेल तर लवकरात लवकर फिट व्हायला सांगितलं होतं. आता केन फिट झाला असून लवकरच तो  पुन्हा एकदा क्रिकेटच्य मैदानात परतणार आहे.

तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.