AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL : 2008 पुरूष IPl मध्ये पहिल्या चौकार, सिक्सरपासून ते विकेटपर्यंत वाचा सर्व काही एका क्लिकवर

2008  स्पर्धेतील पुरूष IPl मध्ये पहिला चौकार, सिक्सर, विकेट आणि पहिली ओव्हर कोणी टाकली होती हे ट्रेडिंग होत आहे. याबाबत आपण जाणून घ्या.

WPL : 2008 पुरूष IPl मध्ये पहिल्या चौकार, सिक्सरपासून ते विकेटपर्यंत वाचा सर्व काही एका क्लिकवर
| Updated on: Mar 04, 2023 | 11:39 PM
Share

मुंबई : वुमन्स आयपीएलच्या हंगामातील पहिला (WPl 2023) सामना झाला असून मुंबई संघाने विजयाचा श्रीगणेशा केला आहे. वुमन्स प्रीमिअर लीगमधील पहिल्या सामन्यामध्ये गुजरात आणि मुंबईच्या खेळाडूंनी पहिलाच सामना खेळत इतिहासात नोंद केली आहे. 2008  स्पर्धेतील पुरूष IPl मध्ये पहिला चौकार, सिक्सर, विकेट आणि पहिली ओव्हर कोणी टाकली होती हे ट्रेडिंग होत आहे. याबाबत आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या दिग्गजांनी हे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.

2008 साली सुरू झालेल्या आयपीएलमध्ये पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला होता. त्यावेळी स्पर्धेतील पहिला चेंडू प्रवीण कुमार याने टाकला होता. तर कोलकाता नाईट रायडर्सच्या ब्रेंडन मॅक्युलम याने पहिली धाव काढली होती. कोलकाता संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला होता तर बंगळुरू संघाची फिल्डिंग होती.

पहिली विकेट ही भारताचा दिग्गज बॉलर झहीर खान याने घेतली होती. झहीरने दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौरव गांगुलीला बाद केलं होतं. पहिला चौकार ब्रेंडन मॅक्युलमनेच मारला होता तर सिक्सरही त्यानेच मारला होता. पहिल्याच सामन्यामध्ये मॅक्युलमने तोडफोड फलंदाजी केली होती. त्यावेळी त्याने नाबाद 158 धावा केल्या होत्या.

दरम्यान, आजच्या सामन्यात पहिला चौकार मारण्याचा मान हा मुंबईच्या हेली मॅथ्यूजने मिळवला. गुजरातची खेळाडू मानसी जोशीच्या षटकात मॅथ्यूज पहिला चौकार मारला. हेलीने संधीचं सोनं करत फक्त चौकारच नाहीतर पहिला सिक्सर मारण्याचा मानही मिळवला. आता राहिलं ते म्हणजे स्पर्धेतील पहिली विकेट, तर गुजरातच्या तनुजा कंवरने यास्तिका भाटियाला बाद करत हा मान मिळवला. तर पहिलं अर्धशतक हरमनप्रीत कौरने ठोकलं आहे.

मुंबई इंडियन्स महिला संघ – यास्तिका भाटिया, हेले मॅथ्यु, नॅट क्विवर ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकार, इसी वाँग, हुमैरा काझी, अमैला केर, अमनजोत कौर, जिंतीमनी कालिता, सायका इशाक

गुजरात जायंट्स महिला संघ – बेथ मूनी, सब्बीनेनी मेघना, हर्लीन देओल, अॅशले गार्डनर, अनाबेल सुथरलँड, दयालन हेमलथा, जॉर्जिया वारेहम, स्नेह राणा, तनुजा कनवार, मानसी जोशी, मोनिका पटेल

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.