MIW vs DCW | मुंबई इंडियन्सची सनसनाटी सुरुवात, डेब्युटंट एस संजनाने शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून मिळवून दिला विजय

MIW vs DCW, WPL 2024 | एस सजना या डेब्यूटंटने मुंबई इंडियन्सला आपल्या पहिल्या आणि टीमच्या डावातील शेवटच्या बॉलवर विजयासाठी 5 धावांची गरज असताना सिक्स ठोकून विजय मिळवून दिला.

MIW vs DCW | मुंबई इंडियन्सची सनसनाटी सुरुवात, डेब्युटंट एस संजनाने शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून मिळवून दिला विजय
| Updated on: Feb 24, 2024 | 10:01 AM

बंगळुरु | डब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राची थरारक, सनसनाटी आणि रोमांचक अशी सुरुवात झाली. मोसमातील दुसऱ्या सत्रातील सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने होते. दिल्लीने विजयासाठी दिलेलं 172 धावांचं आव्हान हे मुंबईने अखेरच्या बॉलवर पूर्ण करत जोरदार सुरुवात केली. मुंबईला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 5 धावांची गरज होती. तेव्हा डेब्युटंट एस संजना हीने खणखणीत सिक्स ठोकून मुंबईला विजय मिळवून दिला.

दिल्लीच्या 172 धावांचा पाठलाग करताना मुंबईची निराशाजनक सुरुवात झाली. हेली मॅथ्यूज दुसऱ्याच बॉलवर झिरोवर आऊट झाली. मात्र त्यानंतर यास्तिका भाटीया 57, नॅट सॅव्हिरय ब्रंट 19, कॅप्टन हरनमप्रीत कौर 55 आणि एमेलिया कीरने 24 धावा करुन मुंबईला विजयाजवळ आणून ठेवलं. मात्र निर्णायक क्षणी पूजा वस्त्राकर 1 रन करुन 20 व्या ओव्हरमधील 5 व्या बॉलवर आऊट झाली. त्यामुळे आता मुंबईला शेवटच्या बॉलवर विजयासाठी 5 धावा हव्या होत्या. अर्थात सिक्सशिवाय पर्याय नव्हता.

पूजा वस्त्राकर आऊट झाल्यानंतर डेब्युटंट एस सजना मैदानात आली. एलिस कॅप्सी शेवटची ओव्हर टाकत होती. आता मुंबईचा जवळपास पराभव हा निश्चित मानला जात होता. मात्र सजनाने गेम बदलला. पदार्पणातील पहिल्याच बॉलवर सजनाने सिक्स खेचून मुंबईला थरारक विजय मिळवून दिला. सजनाने फक्त 1 बॉलमध्ये आपली छाप सोडली.

मुंबई इंडियन्स वूमन्सचा सनसनाटी विजय

मुंबई इंडियन्स वूमन्स प्लेईंग ईलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), अमेलिया केर, अमनजोत कौर, एस सजना, पूजा वस्त्राकर, शबनीम इस्माईल, कीर्थना बालकृष्णन आणि सायका इशाक.

दिल्ली कॅपिट्ल्स वूमन्स प्लेईंग ईलेव्हन | मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, एलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, ॲनाबेल सदरलँड, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव आणि शिखा पांडे.