AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2025 : गुजरात जायंट्सचं दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 128 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील दहावा सामना गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच गुजरातला पॉवरप्लेमध्ये बरोबर कोंडीत पकडलं.

WPL 2025 : गुजरात जायंट्सचं दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 128 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
| Updated on: Feb 25, 2025 | 9:04 PM
Share

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील दहावा सामना गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरु आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून दिल्ली कॅपिटल्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या स्पर्धेतील ट्रेंड पाहता प्रथम गोलंदाजी करणं हे फायद्याचं दिसत आहे. कारण दुसऱ्या डावात पडत असलेलं दव पाहता गोलंदाजी करणं कठीण होतं. तसेच दिलेल्या धावांचा पाठलाग करणंही सोपं होतं. दरम्यान, गुजरात जायंट्सला मोठी धावसंख्या करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे पॉवरप्लेमध्ये आक्रमक फलंदाजी गरजेची होती. मात्र गुजरात डाव पत्त्यासारखा कोसळला. पॉवरप्लेमध्ये चार महत्त्वाचे गडी गमववण्याची वेळ आली. त्यामुळे गुजरातवरील दडपण वाढलं आणि त्यातून सावरणं कठीण झालं. तळाशी आलेल्या भारती फुलमाळीने 29 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने नाबाद 40 धावा केल्या. तिच्या या खेळीमुळे गुजरात जायंट्सने 20 षटकात 9 गडी गमवून 127 धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 128 धावांचं आव्हान आहे. गुजरात जायंट्सला हरलीन देओलच्या रुपाने पहिला धक्का बसला. फक्त 5 धावा करून बाद झाली. त्यानंतर आलेली फोबे लिचफिल्ड काही खास करू शकली नाही. तिला आपलं खातंही खोलता आलं नाही.

संघावर आलेलं दडपण दूर करण्यासाठी खरं तर बेथ मूनीवर दडपण आलं होतं. पण अवघ्या 10 धावा करून शिखा पांडेने तिला तंबूत पाठवलं. एशले गार्डनर या सामन्यात स्वस्तात बाद झाली आणि तिला फक्त 3 धावा करता आल्या. कश्वी गौतमला खातही खोलता आलं नाही. डिएनड्रा डॉटीनने आक्रमक खेळी केली. तिने 24 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने 26 धावा केल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (विकेटकीपर), हरलीन देओल, फोबी लिचफील्ड, ॲशले गार्डनर (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, सिमरन शेख, तनुजा कंवर, भारती फुलमाली, काशवी गौतम, प्रिया मिश्रा, मेघना सिंग.

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, मॅरिझाने कॅप, अ‍ॅनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, सारा ब्राइस (विकेटकीपर), निकी प्रसाद, शिखा पांडे, तितस साधू, मिन्नू मणी.

जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा.
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...