WPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला नमवलं, विजयासह गुणतालिकेत टॉपला

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 13व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 9 गडी राखून पराभव केला. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. तर मुंबईची दुसर्‍या स्थानावर घसरण झाली आहे.

WPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला नमवलं, विजयासह गुणतालिकेत टॉपला
दिल्ली कॅपिटल्स
Image Credit source: Twitter
| Updated on: Feb 28, 2025 | 10:26 PM

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील 13 वा सामना दिल्ली कॅपिटल्सने सहज जिंकला. या सामन्यापूर्वी कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती. पण दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला डोकंच वर काढू दिलं नाही. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने ट्रेंड सुरु असल्याप्रमाणे प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमवून 123 धावा केल्या आणि विजयासाठी 124 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दिल्ली कॅपिटल्सने 1 गडी गमवून 15 व्या षटकातच पूर्ण केलं. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला दोन गुण तर मिळाले वरून नेट रनरेटमध्येही फायदा झाला. दुसरीकडे मुंबई इंडियन्सची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. तसेच नेट रनरेटमध्येही मोठी तफउावात झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून शफाली वर्मानै 28 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्याा मदतीने 43 धावा केल्या. पण अर्धशतक मात्र हुकलं. दुसरीकडे, कर्णधार मेग लेनिंग आणि जेमिमा रॉड्रिग्सने डाव पुढे नेत विजय मिळवून दिला. मेग लेनिंगने 49 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने नाबाद 60 धावा केल्या.

दिल्ली कॅपिटल्सकडून जोनासेन आणि मिनू मनी यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. प्रत्येकी तीन विकेट घेत मुंबई इंडियन्स कंबरडं मोडलं. मिनूने 3 षटकात 17 धावा देत 3 गडी बाद केले. तर जोनासेनने 4 षटकात 25 धावा देत 3 गडी बाद केले. तर शिखा पांडे आणि अनाबेल सुदरलँड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दिल्ली कॅपिटल्स या स्पर्धेतील हा सहावा सामना होता. आता आणखी दोन सामन्यात विजय मिळवला तर अंतिम फेरीचं गणित सुटू शकतं. पण हे गणितही जर तरवर आहे. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सला टॉप तीनमध्ये राहण्याची संधी आहे. दुसरीकडे, आता मुंबई इंडियन्सला उर्वरित तीन सामन्यात विजय मिळवून टॉप स्थान गाठण्याची संधी आहे. आता या संधीचं या दोन संघापैकी कोण सोनं करतं हे पाहणं औत्सु्क्याचं ठरणार आहे.

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लेनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, अ‍ॅनाबेल सदरलँड, मॅरिझाने कॅप, जेस जोनासेन, सारा ब्राइस (विकेटकीपर), निकी प्रसाद, शिखा पांडे, मिन्नू मणी, तितास साधू.

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, जिंतीमणी कलिता.