WPL 2025 : युपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने, नाणेफेक जिंकून मेग लेनिंगने घेतला असा निर्णय
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या सहाव्या सामन्यात युपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आले आहेत. या स्पर्धेत युपी वॉरियर्स अजूनही विजयापासून वंचित आहे. त्यामुळे या सामन्यात काहीही विजयाची प्रतिक्षा असणार आहे. नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागल्याने प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे.

वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील सहावा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात होत आहे. दिल्ली कॅपिटल्स या स्पर्धेत आतापर्यंत दोन सामने खेळले असून एका सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. दिल्ली कॅपिटल्सचे 2 गुण असून -0.882 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे. तर युपी वॉरियर्स या स्पर्धेत आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला असून त्यात पराभूत झाली आहे. त्यामुळे खात्यात एकही गुण नाही आणि -0.850 नेट रनरेटसह शेवटच्या स्थानावर आहे. दरम्यान या सामन्यात नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला. मेग लेनिंग म्हणाली की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करू. आतापर्यंत ते चांगले काम करत आहे, आव्हानात्मक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आम्हाला सुरुवातीलाच खेळ करावा लागेल. आमच्या संघात चांगली खोली आहे, मागचा सामना आमचा सर्वोत्तम नव्हता, आज आम्ही कठोर परिश्रम करू. आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत, आम्ही बरेच काही चांगले करू शकतो आणि आम्ही उत्साहित आहोत. राधा यादवच्या जागी निक्की प्रसादची निवड झाली आहे.’
युपी वॉरियर्सची कर्णधार दीप्ती शर्मा म्हणाली की, ‘आम्हीही प्रथम गोलंदाजी केली असती. आम्हाला एक चांगला धावसंख्या मिळवायची आहे जी आम्ही वाचवू शकू. जितके जास्त सामने तुम्ही खेळाल तितके अनुभव आणि शिकणे नेहमीच असते. महिला क्रिकेटसाठी हे खूप चांगले आहे.आमच्या संघात दोन बदल आहेत. अलाना किंग आणि सायमा ठाकोर यांना वगळले असून चिनेल हेन्री आणि राजेश्वरी गायकवाड संघात आले आहेत.’
दोन्ही संघांची प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, मॅरिझाने कॅप, अॅनाबेल सदरलँड, निकी प्रसाद, सारा ब्राइस (विकेटकीपर), जेस जोनासेन, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी.
यूपी वॉरियर्स महिला (प्लेइंग इलेव्हन) : किरण नवगिरे, वृंदा दिनेश, उमा चेत्री (विकेटकीपर), दीप्ती शर्मा (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, चिनेल हेन्री, श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टोन, क्रांती गौड, राजेश्वरी गायकवाड