
वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात जायंट्स या सामन्याने सुरुवात झाली आहे. हे वुमन्स प्रीमियर लीगचं तिसरं पर्व आहे. पहिल्या पर्वात मुंबई इंडियन्सने बाजी मारली होती. दुसऱ्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विजयी ठरली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु गतविजेता असून यंदा त्यांना आपलं जेतेपद शाबूत ठेवण्याचं आव्हान आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने लागला कर्णधार स्मृती मंधानाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दव फॅक्टर आणि खेळपट्टीचा अंदाज घेऊन स्मृती मंधानाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आव्हानाचा पाठलाग करणं सोपं जाईल, असं स्मृती मंधाना म्हणाली.
‘बडोद्यात परतणे चांगले आहे. आम्ही एक महिना आधी इथे होतो. मला वाटले होते की ते गुजरातचे होम ग्राउंड असेल पण ते आमचे होम ग्राउंड आहे असे दिसते. आम्हाला प्रथम गोलंदाजी करायला आवडेल. दव हा एक मोठा घटक आहे म्हणून दव येण्यापूर्वी काही षटके खेळणे चांगले राहील. आमचे सराव सत्र चांगले होते, तयारी चांगली होती. काही सक्तीचे बदल झाले. पेरी, वेअरहॅम, डॅनी आणि किम.’, असं स्मृती मंधाना हीने सांगितलं. गुजरात जायंट्सने अॅशले गार्डनरने सांगितलं की, ‘आम्हीही गोलंदाजी करणार होतो पण ते ठीक आहे. गुजरातच्या मुलींशी आमचे चांगले संबंध निर्माण झाले आहेत. आमच्या संघात तरुणाई आणि अनुभव आहे. सुरुवात करण्यास उत्सुक आहे. पाच पदार्पण करणार आहे. ‘
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), डॅनियल व्याट-हॉज, एलिस पेरी, रघवी बिस्ट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, किम गर्थ, प्रेमा रावत, जोशिता व्हीजे, रेणुका ठाकूर सिंग.
गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड, बेथ मूनी (विकेटकीपर), दयालन हेमलता, ॲशलेग गार्डनर (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, सिमरन शेख, तनुजा कंवर, सायली सातघरे, प्रिया मिश्रा, काशवी गौतम.