WPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सने जिंकला नाणेफेकीचा कौल, कर्णधार मेग लेनिंगने घेतला असा निर्णय

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वातील दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि कर्णधार मेग लेनिंग हीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

WPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सने जिंकला नाणेफेकीचा कौल, कर्णधार मेग लेनिंगने घेतला असा निर्णय
| Updated on: Feb 15, 2025 | 7:10 PM

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आले आहेत. अंतिम फेरीचं तिकीट गाठण्यासाठी प्रत्येक विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघ या स्पर्धेची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करतील. दिल्ली कॅपिटल्सने सलग दोन पर्वात अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पहिल्या पर्वात मुंबईने, तर दुसऱ्या पर्वात आरसीबीने पराभवाची धूळ चारली होती. तिसऱ्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी कशी असेल याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लेनिंगने सांगितलं की, आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. काल रात्री आम्ही पाहिल्याप्रमाणे, खूप चांगली विकेट आहे आणि आम्हाला एक संघ म्हणून एकत्र येण्याची संधी देते. आमच्याकडे खरोखरच चांगल्या संघाचे गुण आहेत. सारा ब्राइस आणि निकी प्रसाद यांनी आमच्यासाठी पदार्पण केले.

मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितलं की, नक्कीच गोलंदाजी केली असती, पण काल ​​रात्री आम्हाला दिसले की चेंडू बॅटवर चांगला येत आहे आणि आशा आहे की आम्ही चांगली फलंदाजी करू. गेल्या हंगामात आम्हाला निर्भय क्रिकेट खेळायचे होते आणि या हंगामातही आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करू. योग्य गोष्टी करणे हेच आम्हाला करायचे आहे. आम्हाला काहीही नवीन करण्याचा प्रयत्न करायचा नव्हता, गेल्या हंगामात आम्हाला थोडे यश मिळाले आणि पहिल्या हंगामात आम्ही सर्वकाही बरोबर केले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णदार), अमेलिया केर, सजीवन सजाना, अमनजोत कौर, जिंतीमणी कलिता, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सायका इशाक.

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लेनिंग (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, निकी प्रसाद, सारा ब्राइस (विकेटकीपर), शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, राधा यादव.

दोन्ही संघाचे खेळाडू

मुंबई इंडियन्स महिला संघ: हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, सजीवन सजना, शबनीम इस्माईल, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक, जिंतिमनी कलिता, क्लोईमन कलिता, चलोमन, चलोमन, टी. कमलिनी, संस्कृती गुप्ता, अक्षिता माहेश्वरी, नदीन डी क्लार्क.

दिल्ली कॅपिटल्स महिला संघ: शफाली वर्मा, मेग लेनिंग (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, ॲनाबेल सदरलँड, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, तानिया भाटिया(विकेटकीपर), राधा यादव, शिखा पांडे, जेस जोनासेन, सारा ब्राइस, तितस प्रसाद, नन्ने प्रसाद, नीती साद, नन्नी सादिक नल्लापुरेड्डी चरणी.