AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2025, MI vs GG : मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात एलिमिनेटर सामना, कोण मारणार बाजी?

वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्स सलग तिसऱ्या पर्वात थेट अंतिम फेरी गाठली आहे. दुसरीकडे, अंतिम फेरी गाठण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ दिल्ली कॅपिटल्सशी जेतेपदासाठी लढणार आहे.

WPL 2025, MI vs GG : मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात एलिमिनेटर सामना, कोण मारणार बाजी?
गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्सImage Credit source: Mumbai Indians Twitter
| Updated on: Mar 12, 2025 | 3:47 PM
Share

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत टॉपला राहात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर दुसऱ्या संघासाठी मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात लढत होणार आहे. या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने 8 सामने खेळत 5 विजय आणि 3 पराभवांसह एकूण 10 गुण मिळवले आहेत. यासह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आणि थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दिल्ली कॅपिटल्सने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुन्हा एकदा अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघ त्यांच्या प्रतिस्पर्ध्याची वाट पाहत आहे. 13 मार्चला एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.

मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स या स्पर्धेत दोन वेळा आमनेसामने आले आहेत. दोन्ही वेळेस मुंबई इंडियन्स गुजरात जायंट्सला लोळवलं आहे. 18 फेब्रुवारीला झालेल्या साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सला 5 विकेटने पराभूत केलं. तर 10 मार्चला झालेल्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजराज जायंट्सला 9 धावांनी पराभूत केलं आहे. जर एलिमिनेटर फेरीत गुजरातने विजय मिळवला, तर आयपीएलच्या तिसऱ्या पर्वात नवा विजेता मिळू शकतो. कारण मागच्या दोन पर्वात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजय मिळवला आहे.  मुंबईने गुजरातला हरवत अंतिम फेरी गाठली तर दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरण्याची संधी आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

मुंबई इंडियन्स : हरमनप्रीत कौर (कर्णधार) , अक्षिता माहेश्वरी , अमनदीप कौर , अमनजोत कौर , अमेलिया केर , क्लो ट्रायॉन , हेली मॅथ्यूज , जिंतिमनी कलिता , कीर्थना बालकृष्णन , नदिन डी क्लर्क , नॅट सायव्हर-ब्रंट साजारी , नॅट सायव्हर -ब्रंट साजारी , कमलिनी , यास्तिका भाटिया , सायका इशाक , शबनीम इस्माईल , पारुनिका सिसोदिया.

गुजरात जायंट्स : भारती फुलमाली , लॉरा वोल्वार्ड , फोबी लिचफिल्ड , सिमरन शेख , ॲश्ले गार्डनर , डॅनिएल गिब्सन , दयालन हेमलता , डिआंड्रा डॉटिन , हरलीन देओल , बेथ मुनी ( कर्णधार) , काशवी गौतम , मन्नत प्रिषीक , मन्नत प्रिषक , मिकस, , शबनम मो. शकील , सायली सातघरे , तनुजा कंवर

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.