AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत सर्वात वर्ल्डकप विजेत्या खेळाडूने केलं पदार्पण, सामना सुरु होताच नोंदवला विक्रम

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं तिसरं पर्व सुरु आहे. या स्पर्धेतील पाचव्या सामन्यात वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंनी प्लेइंग इलेव्हमध्ये स्थान मिळवताच एका विक्रमाची नोंद केली आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हरमनप्रीत कौरने प्लेइंग इलेव्हनबाबत सांगताच सामन्याआधीच जी कमालिनीने नोंदवला विक्रम

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत सर्वात वर्ल्डकप विजेत्या खेळाडूने केलं पदार्पण, सामना सुरु होताच नोंदवला विक्रम
Image Credit source: Twitter
| Updated on: Feb 18, 2025 | 8:04 PM
Share

वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील पहिला सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. नाणेफेकीचा कौल जिंकताच मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दव फॅक्टर आणि आतापर्यंतच्या चार सामन्यांचा निकाल पाहता हा निर्णय घेतला. इतकंच काय तर गुजरातची कर्णधार गार्डनर हीलाही प्रथम गोलंदाजी करायची होती. नाणेफेकीचा कौल होताच मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने सांगितलं की, ‘आपण प्रथम गोलंदाजी करू. पहिली सहा षटके प्रथम गोलंदाजी करणे खूप महत्वाचे आहे आणि आम्हाला त्याचा फायदा घ्यायचा आहे. आपण खूप चांगले क्रिकेट खेळलो आणि शेवटच्या चेंडूपर्यंत खेळत होतो आणि आज आपण दोन खेळाडू पदार्पण करत आहोत. साईका इशाकच्या जागी परुनिका खेळत आहे. कामिलिनी देखील खेळत आहे. ते खूप प्रेरित आहेत आणि त्यांच्यासोबत खेळण्यास उत्सुक आहोत.’

जी कमालिनीने अंडर 19 वर्ल्डकप 2025 स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. वर्ल्डकप जिंकवण्यात तिने मोलाची भूमिका बजावली होती. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत तिला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळताच तिने एका विक्रमाची नोंद केली आहे. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत खेळणारी सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली आहे. जी कमालिने 16 वर्षे आणि 213 दिवसांची असताना पदार्पण केलं. यापूर्वी हा विक्रम गुजरातच्या शबनम शकीलच्या नावावर होता. तिने 16 वर्षे आणि 263 दिवसांची असताना पदार्पण केलं होतं. युपी वॉरियर्सची पर्शवी चोप्री ही तिसरी तरुण खेळाडू ठरली होती. तिने 2023 मध्ये 16 वर्षे 312 दिवसांची असताना पदार्पण केलं होतं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड, बेथ मुनी (विकेटकीपर), दयालन हेमलता, ॲशलेग गार्डनर (कर्णधार), हरलीन देओल, डिआंड्रा डॉटिन, सिमरन शेख, तनुजा कंवर, सायली सातघरे, काशवी गौतम, प्रिया मिश्रा.

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जी कमलिनी, अमेलिया केर, सजीवन सजना, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदिया

युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....