
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत युपी वॉरियर्सला मुंबई इंडियन्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. या पराभवसह युपी वॉरियर्स 4 गुणांसह तळाशी आहे. आता युपीचा शेवटचा सामना शिल्लक आहे. हा सामना जिंकला तरी 6 गुण होतील. त्यामुळे सुपर 3 फेरीत पोहोचण्याचं स्वप्न डळमळीत झालं आहे. युपी वॉरियर्सने 150 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान मुंबई इंडियन्सचने 18.3 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. या पराभवानंतर युपी वॉरियर्सची कर्णधार दीप्ती शर्माने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
युपी वॉरियर्सची कर्णधार दीप्ती शर्मा म्हणाली, ‘आम्ही मधल्या फळीत सलग चुका करत आहोत, आमची टॉप-ऑर्डर आणि लोअर-ऑर्डर चांगली कामगिरी करत आहेत, आम्हाला मधल्या फळीकडे पाहण्याची गरज आहे. पण आमच्यातही सकारात्मक बाबी आहेत आणि आज रात्री व्होलला फलंदाजीने कामगिरी करताना पाहून आनंद झाला. आम्हाला मधल्या फळीतील फलंदाजांकडून खूप अपेक्षा होत्या आणि शेवटच्या सामन्यात सर्वोत्तम कामगिरीची आशा करूया. एक खेळाडू म्हणून, मी नेहमीच प्रत्येक विभागात स्वतःला कसे सुधारायचे याचा विचार करते. पण मी नेहमीच शिकत असते की पुढच्या सामन्यात मी कसे चांगले करू शकतो.’
मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने सांगितलं की, ‘त्यांनी खरोखरच चांगली फलंदाजी केली, पहिल्या सहा षटकांत आम्हाला परिस्थितीचा फायदा घेता आला नाही. आम्हाला माहित होते की आम्हाला खेळात परत येण्यासाठी फक्त एका विकेटची आवश्यकता आहे. संधी योग्य वेळी आली. केर नेहमीच विकेट मिळविण्याचा प्रयत्न करते, आज तिने खरोखरच चांगली गोलंदाजी केली आणि सर्व महत्त्वाच्या विकेट घेतल्या. आम्ही खूप लवचिक आहोत, आम्हाला खरोखर चांगली तयारी करावी लागेल, आज आम्ही आमच्यासाठी जे सर्वोत्तम होते ते केले. आम्ही एकत्र राहण्याचा प्रयत्न करतो. आज आम्ही ज्या पद्धतीने खेळलो त्याबद्दल खरोखर आनंदी आहोत.’
मुंबई इंडियन्स महिला प्लेइंग इलेव्हन : यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, सजीवन सजना, जी कमलिनी, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदीया.
यूपी वॉरियर्स महिला प्लेइंग इलेव्हन : दीप्ती शर्मा (कर्णधार), ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, जॉर्जिया वॉल, वृंदा दिनेश, श्वेता सेहरावत, उमा चेत्री (विकेटकीपर), चिनेल हेन्री, सोफी एक्लेस्टोन, गौहर सुलताना आणि क्रांती गौड.