WPL 2026 Final, RCB vs DC : दिल्ली-बंगळुरु फायनलसाठी सज्ज, महाअंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals, WPL 2026 Final Live Streaming : वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या हंगामात दिल्ली आणि बंगळुरु यांच्यात ट्रॉफीसाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या अंतिम सामन्याबाबत सर्व महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

WPL 2026 Final, RCB vs DC : दिल्ली-बंगळुरु फायनलसाठी सज्ज, महाअंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
Jemimah Roudrigues and Smriti Mandhana WPL 2026 Final
Image Credit source: WPL/BCCI
| Updated on: Feb 04, 2026 | 11:41 PM

वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमात गतविजेता मुंबई इंडियन्सचं साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स हे दोन्ही संघ अपयशी ठरले. तर चौथ्या मोसमात (WPL 2026) 21 सामन्यानंतर अखेर अंतिम फेरीतील 2 संघ निश्चित झालेत. दिल्लीने सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक दिली. तर स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. आता डब्ल्यूपीएल ट्रॉफीसाठी दिल्ली आणि बंगळुरु या 2 संघात चुरस पाहायला मिळणार आहे. हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स महाअंतिम सामना कधी?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स महाअंतिम सामना गुरुवारी 5 फेब्रुवारीला होणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स महाअंतिम सामना कुठे?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स महाअंतिम सामना बडोद्यातील कोतांबी येथील बीसीए स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स महाअंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स महाअंतिम सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स महाअंतिम सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स महाअंतिम सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स महाअंतिम सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स महाअंतिम सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह पाहता येईल.

आरसीबी-दिल्लीपैकी वरचढ कोण?

वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात आकडेवारी पाहता दिल्ली कॅपिट्ल्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर वरचढ असल्याचं स्पष्ट होतं. दिल्ली आणि आरसीबी या दोन्ही संघात या स्पर्धेच्या इतिहासात एकूण 9 सामने खेळवण्यात आले आहेत. दिल्लीने 9 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर आरसीबीला 3 सामनेच जिंकता आले आहेत. अशात आता दिल्ली आरसीबी विरुद्ध दहावा विजय मिळवून ट्रॉफी जिंकणार की आरसीबी दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.