WPL 2026 Auction: मेगा ऑक्शन पूर्ण, यूपीकडून जोरदार शॉपिंग, कोणत्या संघात कोणते खेळाडू? जाणून घ्या

WPL 2026 Auction 5 Teams Updated Sqaud : वूमन्स प्रीमियर लीग 2026 साठी झालेल्या मेगा ऑक्शनमधून 11 खेळाडू कोट्यधीश झाले. यूपी वॉरियर्स टीमने सर्वाधिक खेळाडू घेतले. जाणून घ्या.

WPL 2026 Auction: मेगा ऑक्शन पूर्ण, यूपीकडून जोरदार शॉपिंग, कोणत्या संघात कोणते खेळाडू? जाणून घ्या
WPL MI vs RCB
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 27, 2025 | 11:23 PM

वूमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेसाठी मेगा ऑक्शन पार पडलं. या मेगा ऑक्शनमध्ये एकूण 277 खेळाडू सहभागी झाले होते. मात्र त्यापैकी 5 संघांना जास्तीत जास्त 73 खेळाडूंचीच गरज असल्याचं स्पष्ट होतं. यूपी वॉरियर्सने या मेगा ऑक्शमध्ये पाण्यासारखा पैसा ओतला. यूपीकडे इतर 4 संघांच्या तुलनेत सर्वाधिक रक्कम होती. त्यामुळे यूपीने भरघोस शॉपिंग केली. दीप्ती शर्मा ही डब्ल्यूपीएल 2026 मधील सर्वात महागडी खेळाडू ठरली. दीप्तीसाठी यूपी वॉरियर्सने 3 कोटींपेक्षा अधिक रक्कम मोजली. या मेगा ऑक्शनमधून या 5 संघांनी एकूण किती खेळाडू आपल्या गोटात घेतले? तसेच या मेगा ऑक्शननंतर 5 संघांत कोणते खेळाडू आहेत? हे सविस्तर जाणून घेऊयात.

डब्ल्यूपीएल 2026 मेगा ऑक्शनद्वारे 67 खेळाडूंची निवड करण्यात आली. या 67 खेळाडूंसाठी 5 फ्रँचायजींनी 40 कोटी 80 लाख रुपये मोजले. या 40 कोटी 80 लाखपैकी 21 कोटी 65 लाख रुपये भारतीय खेळाडूंवर खर्च करण्यात आले. यूपी वॉरियर्सने दीप्ती शर्मा हीच्यासाठी 3 कोटी 20 लाख रुपये मोजले.

यूपी वॉरियर्सने ऑक्शनद्वारे सर्वाधिक 17 खेळाडूंना आपल्या गोटात घेतलं. गुजरातने 16 खेळाडूंचा समावेश केला. गतविजेता आरसीबीने 12 खेळाडू आपल्या ताफ्यात घेतले. तर डब्ल्यूपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी असलेल्या मुंबई इंडियन्स टीमने आणि दिल्ली कॅपिट्ल्स या दोघांनी प्रत्येकी 11-11 खेळाडूंना घेतलं.

11 खेळाडू कोट्यधीश

या मेगा ऑक्शनमधून 11 खेळाडू कोट्यधीश झाले. युपीने 11 पैकी सर्वाधिक खेळाडूंवर 1 कोटीपेक्षा अधिकची बोली लावली. युपीने 5 खेळाडूंना 1 कोटींपेक्षा अधिक रक्कम देत आपल्या ताफ्यात घेतलं. दिल्ली कॅपिट्ल्सने 3 क्रिकेटपटूंना कोट्यधीश केलं.

मुंबई इंडियन्स: हरमनप्रीत कौर (कर्णधार), नॅट सायव्हर-ब्रँट, अमेलिया केर, हॅली मॅथ्यूज, अमनजोत कौर, सजीवन सजना, शबनीम इस्माइल, गुनालन कुलकर्णी, निकोला कॅरी, संस्कृती गुप्ता, राहिल फिरदौस, पूनम खेमनार, त्रिवेणी वशिष्ठ, नल्ला रेड्डी, साइका इशाक आणि मिली इलिंगवर्थ.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु: स्मृती मंधाना (कॅप्टन), ऋचा घोष, एलिस पेरी, लॉरेन बेल, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, राधा यादव, नादीन डी क्लर्क, श्रेयंका पाटील, जॉर्जिया वोल, लिंसे स्मिथ, प्रेमा रावत, गौतमी नाईक, प्रथ्योषा कुमार आणि दयालन हेमलता.

दिल्ली कॅपिटल्स : शफाली वर्मा, एनाबेल सदरलँड, जेमिमा रॉड्रिग्स, मारिजान काप, श्री चरणी, शिनेल हेन्री, लॉरा वॉल्डवॉर्ट, निकी प्रसाद, स्नेह राणा, तानिया भाटिया, लिजेल ली, दिया यादव, ममता मदिवाला, नंदनी शर्मा, लूसी हॅमिल्टन आणि मिन्नू मणी.

गुजरात जायंट्स: एश्ले गार्डनर, बेथ मूनी, सोफी डिव्हाइन, जॉर्जिया वेयरहम, भारती फुलमाली, काशवी गौतम, रेणुका सिंह, यास्तिका भाटिया, अनुष्का शर्मा, तनुजा कंवर, कनिका आहूजा, तितास साधु, हॅप्पी कुमारी, किम गार्थ, शिवानी सिंह, डेनियल वॅट-हॉज, राजेश्वरी गायकवाड आणि आयुषी सोनी.

यूपी वॉरियर्स: दीप्ती शर्मा, शिखा पांडे, मेग लॅनिंग, फीबी लिचफील्ड, आशा शोभना, सोफी एक्लेस्टन, डिएंड्रा डॉटीन, किरण नवगिरे, क्रांति गौड, श्वेता सेहरावत, हरलीन देओल, क्लो ट्रायोन, सुमन मीना, सिमरन शेख, जी त्रिशा आणि प्रतीक रावल.